रत्ना टुडे पान १ संक्षिप्त

रत्ना टुडे पान १ संक्षिप्त

आणखी चार गाड्यांना वाढीव डबे
खेड ः गणेशोत्सवानिमित्त मध्य-कोकण रेल्वेने आणखी चार रेल्वेगाड्यांना प्रत्येकी दोन डबे आणि दिवा-चिपळूण मेमूला चार डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यंदा कोकणात २२ डब्यांच्या आठ रेल्वेगाड्या धावणार असून, गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गाडी एलटीटी-मंगळुरू-एलटीटी एक्स्प्रेस (१६ फेऱ्या), गाडी एलटीटी-कुडाळ-एलटीटी एक्स्प्रेस (२४ फेऱ्या) या रेल्वेगाड्यांना प्रत्येकी दोन डबे अधिक जोडण्यात येणार आहेत. गाडी दिवा-चिपळूण-दिवा मेमूला (३६ फेऱ्या) प्रत्येकी चार डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे आठ डब्यांची मेमू आता १२ डब्यांची धावेल. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि सीएसएमटी-सावंतवाडी रोड-सीएसएमटी या दोन्ही गाड्यांच्या २२ फेऱ्या २२ डब्यांच्या चालवण्याचा निर्णय मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. नव्या संरचनेनुसार उत्सव विशेष फेऱ्या एलएचबी रेल्वेगाड्याऐवजी आयसीएफ रेल्वेगाडीमध्ये धावणार आहे. २० शयनयान श्रेणीचे डबे आणि दोन डबे सीटिंग कम लगेज या श्रेणीतील असणार आहेत.
-----

कामगार पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा
चिपळूण : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्याकडून प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या आदर्श कामगार व कामगार भूषण पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. विविध क्षेत्रात कार्यरत, कल्याण निधी कपात होणे आवश्यक आहे. १५ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत मंडळाच्या वेब पोर्टलवर लिंक खुली असून शुल्क ऑनलाईन भरून अर्ज दाखल करण्याची सुविधा आहे. पुढील आवश्यक माहितीसाठी कामगार कल्याण केंद्र गट कार्यालय चिपळूण येथे संपर्क साधा, असे आवाहन कल्याण अधिकारी अरुण लाड यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com