औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा निकाल 98.74 टक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा निकाल 98.74 टक्के
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा निकाल 98.74 टक्के

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा निकाल 98.74 टक्के

sakal_logo
By

३२ (पान ५ साठी)


औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा निकाल ९८.७४ टक्के

‘आयसीटीएमएस’चा हेलगंड प्रथम ; दीक्षांत समारंभ


सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २०ः अखिल भारतीय व्यवसाय जुलै २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरीच्या प्रशिक्षणार्थ्यानी यश मिळविले. या परीक्षेत संस्थेचा निकाल ९८.७४ टक्के लागला. संपूर्ण संस्थेमध्ये आयसीटीएमएसचा प्रशिक्षणार्थी नामदेव प्रदीप हेलगंड हा ९६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. इलेक्ट्रीशियनची प्रशिक्षणार्थी गौरी संदीप पवार ही ९५.३३ गुण मिळवून व्दितीय तर इलेक्ट्रीशियनचे प्रशिक्षणार्थी साहिल संजय चव्हाण व मैथिली विजय पालकर हे ९५.१७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
संस्थेच्या कौशल्य दीक्षांत समारंभात गुणवंत प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये प्रत्येक व्यवसायातील प्रथम तीन क्रमांकाना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रशिक्षणार्थ्यानी फक्त कामगार म्हणून काम न करता उद्योजक बनावे असे प्रतिपादन नाचणे गावचे सरपंच ऋषिकेश भोंगले यांनी व्यक्त केले. तसेच प्रशिक्षणार्थ्यनी सुरवातीला मिळेल त्या कंपनीमध्ये काम करुन आपला अनुभव वाढवून आपले कतृत्व सिद्ध करावे असे आवाहन फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे डेप्युटी मॅनेजर परचेस तसेच संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ए. टी, पोतदार यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य एस. जी. कोतवडेकर, यांनी मार्गदर्शन करताना प्रशिक्षणार्थ्यांनी यापुढे देखील असेच यश मिळवावे असा सल्ला दिला.