चिपळूण-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त
चिपळूण-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

चिपळूण-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

sakal_logo
By

-rat22p15.jpg23M32778 निलम गोंधळी
-----------
भाजप उत्तर रत्नागिरीच्या
सरचिटणीसपदी निलम गोंधळी
चिपळूण ः भाजपाच्या अभ्यासू, आक्रमक आणि माजी सभापती म्हणून जिल्ह्यात काम करणाऱ्या सौ. नीलम गोंधळी यांची उत्तर रत्नागिरी सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे. यामुळे उत्तर रत्नागिरी विभागातील भाजपा अभ्यासू आणि उत्तम संघटन कौशल्य असणारे नेतृत्व मिळाले आहे. भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या अशी ओळख असणाऱ्या सौ. निमल गोंधळी यांनी पक्षाच्या अडचणीच्या काळात योगदान दिले. काही वर्षे महिला मोर्चाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा म्हणून त्यांनी काम केले होते. जिल्हापरिषदेत सभापती म्हणून काम करणाऱ्या गोंधळी यांनी या पदाच्या माध्यमातून जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता. उत्तर रत्नागिरी विभागातील गुहागर, खेड,दापोली, मंडगड, चिपळूण या तालुक्याची जबाबदारी त्याच्यावर देण्यात आली आहे. सौ. गोंधळी भाजपाच्या प्रदेश कमिटीवर ही काम करीत आहेत. महिला मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी दौरा करून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि महिला शक्ती पक्षाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी काम केले.
--------

विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी
शेखर घोरपडेची निवड

चिपळूण ः सह्याद्री शिक्षण संस्थेच्या खेर्डी-चिंचघरी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत यश मिळवले. रत्नागिरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात साहिल कुंभार याने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच शेखर घोरपडे याने१९ वर्षे वयोगटात अटीतटीच्या लढतीत उल्लेखनीय डावपेचात शानदार गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवून अंतिम विजेतेपद मिळवले. कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी शेखर घोरपडे याची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांनी कामथे येथे झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरावर नैपुण्य दाखवले होते. या विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक महेश सावंत, विनय गोठणकर यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, मुख्याध्यापक संजय वरेकर, उपमुख्याध्यापक विश्वास दाभोळकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले.
--------

खेड बसस्थानकात प्रवासी शेडचे बांधकाम वेगाने

खेड ः खेड बसस्थानकातील मोकळ्या जागेत भाजपाचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांच्या पुढाकारातून प्रवासी शेड बांधण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. या शेडचा चिपळूण व दापोली मार्गावरील प्रवाशांना लाभ होणार असून वाहतूक नियंत्रण कक्षासमोरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. बसस्थानकातील अपुऱ्या जागेअभावी बऱ्याचवेळा विशेषत: सुट्ट्यांच्या हंगामात एसटी फेऱ्या स्थानकाच्या आवाराबाहेरील मुख्य रस्त्यांवर अडकून राहतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. शिवाय स्थानकात दोन ठिकाणी दुचाकींच्या होणाऱ्या विनापरवाना पार्किंगची समस्याही डोकेदुखी ठरते. या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी आगारप्रमुख यांच्याकडून बसस्थानकातील उत्तर दिशेकडील प्रवेशद्वारालगत मोकळ्या जागेत प्रवाशी शेड उभारण्याचे प्रयत्न सुरू होते. भाजपाचे तालुकाध्यक्ष मोरे व वडगावचे सुपुत्र व भाजपचे संजय मोरे यांच्या मदतीने नव्याने बांधण्यात येणाऱ्या प्रवासी शेडमुळे बसस्थानकात सुटसुटीतपणा येईल या सुटसुटीतपणा जागेसमोरील दुचाकींच्या नो- पार्किंगची समस्या सुटून दर अर्ध्या ते एक तासांनी सुटणाऱ्या चिपळूण व दापोली मार्गावरील फेऱ्यांचा प्रवाशांना सहजगत्या लाभ घेता येणार आहे. चिपळूण व दापोली मार्गावर सुटणाऱ्या फेऱ्या शेडसमोर उभ्या केल्या जाणार आहेत.