Sat, December 2, 2023

रत्नागिरी-संक्षिप्त
रत्नागिरी-संक्षिप्त
Published on : 22 September 2023, 12:11 pm
ए
देव्हारेत रक्तदान शिबिर
मंडणगड ः संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन, तालुका आरोग्य विभाग व ग्रामीण रुग्णालयातर्फे रक्तदान शिबिर देव्हारे येथील संत निरंकारी सत्संग भवन येथे झाले. शिबिराचे उद्घाटन ज्ञान प्रचारक मिलिंद कासार यांचे हस्ते झाले. शिबिरात ६३जणांनी रक्तदान केले. कार्यक्रमाला या वेळी सरपंच प्रेमिला दळवी, देव्हारे शाखेचे बाळाराम बैकर, तालुका आरोग्य अधिकारी चरके, ग्रामीण रुग्णालय विभागाचे प्रमुख भावठाणकर आदी उपस्थित होते.