नीलेश राणे यांनी घेतले ''सिंधुदुर्ग राजा''चे दर्शन
33873
कुडाळ ः ‘सिंधुदुर्ग राजा’चे दर्शन घेतल्यानंतर माजी खासदार नीलेश राणे यांना गणरायाचा प्रसाद देताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई. समवेत भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते. (छायाचित्र ः अजय सावंत)
नीलेश राणे यांनी घेतले
‘सिंधुदुर्ग राजा’चे दर्शन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ ः भाजपचे कुडाळ-मालवण विधानसभा प्रभारी तथा माजी खासदार नीलेश राणे यांनी आज येथील कार्यालयात प्रतिष्ठापित केलेल्या ‘सिंधुदुर्ग राजा’चे दर्शन घेतले. नीलेश राणे हे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून येऊ देत, असे गाऱ्हाणे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून गणरायाचरणी घालण्यात आले.
माजी खासदार राणे यांच्या संकल्पनेतून येथील भाजप कार्यालयात प्रतिवर्षी सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना केली जाते. यंदा हा गणेशोत्सव १७ दिवस साजरा करण्यात येत आहे. या गणरायाचे दर्शन आज राणे यांनी घेतले. गणरायाला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. महिला प्रदेश कार्यकारिणी सदस्य संध्या तेरसे, जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, चिटणीस विनायक राणे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य पप्या तवटे, तालुका मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल तालुकाध्यक्ष दादा साईल, माजी सभापती मोहन सावंत, कुडाळ तालुका युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, नगरसेवक विलास कुडाळकर, नीलेश परब, ॲड. राजीव कुडाळकर, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, भाजप शक्तिकेंद्रप्रमुख राकेश नेमळेकर, नागेश नेमळेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.