-राजापुरात ११ वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा

-राजापुरात ११ वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा
Published on

३ (टुडे पान १ साठी, अॅंकर)


-rat२१p११.jpg-
२४M८४९५२
राजापूर ः पाण्याअभावी कोरडे झालेले धरण.
----------

राजापूर तालुक्यातील ११ वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा

टंचाईच्या भीषणतेत वाढ ; जलस्त्रोत खालावले, प्रशासनाकडून पाणी पुरवठ्याचे नियोजन सुरू

सकाळ वृत्तसेवा

राजापूर, ता. २१ ः वाढत्या उकाड्याने जलस्त्रोत खालावले असून तालुक्यातील नऊ गावातील अकरा वाड्यांना तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. तुळसवडे, ताम्हाणे आणि जवळेथर अशी तीन गावांतील वाड्यांमधील लोकांनीही टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. त्यांना अद्यापही पाणीपुरवठा सुरू झाला नसल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आली. येत्या दोन दिवसांमध्ये त्या वाड्यांमध्ये टँकर धावण्याची शक्यताही प्रशासनाकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील टंचाईची भीषणता वाढत चालली आहे.
तीन वर्षानंतर राजापूरमध्ये टँकर धावू लागला आहे. सद्यस्थितीमध्ये तालुक्यातील नऊ गावांतील अकरा वाड्यांमधील सुमारे एक हजारीहून अधिक लोकांना तीन टँकरद्वारे पंचायत समिती प्रशासनाकडून पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाईची भीषणता अधिकच वाढत चालली आहे. ग्रामस्थांना एक घागर पाण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागत आहे. तीन गावांमधील वाड्यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. त्यामध्ये येत्या दोन दिवसांमध्ये आणखीन काही गावांची भर पडण्याची शक्यता आहे. टँकरची मागणी केलेल्या तीन गावांना अद्यापही पाणीपुरवठा सुरू झाला नाही. दोन दिवसांमध्ये या टंचाईग्रस्त वाड्यांना चौथ्या टँकरने पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात आली.
---------------
पाणीपुरवठा होत असलेली गावे आणि वाड्या
ओणी-पाचल फाटा, ओझर-धनगरवाडी, वडवली-बौद्धवाडी, शिवाजीनगर, वडदहसोळ-हळदीची खांदवाडी, दोनिवडे-धनगरवाडी, कोंड्येतर्फ सौंदळ -बौद्धवाडी, तळगाव-तांबटवाडी, नवानगर देवाचेगोठणे-पाटवाडी, प्रिंदावण-तळेखाजण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com