

३१ (पान ५ साठी)
-rat२१p१७.jpg-
२४M८४९९५
रत्नागिरी ः रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि वृक्षवल्ली रत्नागिरी यांच्यातर्फे सुंदर माझी बाग स्पर्धेत टेरेस गार्डन कॅटेगिरीमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस स्वीकारताना संदीप पावसकर.
-------
‘सुंदर बाग’ स्पर्धेत
पावसकर, कारेकर प्रथम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ ः रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि वृक्षवल्ली रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरीने मे महिन्यात सुंदर माझी बाग ही अभिनव स्पर्धा भरवली होती. टेरेस गार्डन कॅटेगरिमध्ये संदीप पावसकर तसेच ओपन आऊटडोअर कॅटेगरी प्रकारात किशोर कारेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
सुंदर माझी बाग या स्पर्धा ओपन ऑऊटडोअर कॅटेगरी व टेरेस गार्डन कॅटेगरी अशा दोन प्रकारात भरविण्यात आल्या होत्या. टेरेस गार्डन कॅटेगरी प्रकारात प्रथम क्रमांक संदीप पावसकर, द्वितीय क्रमांक साई अनिषा मुरकर यांना देण्यात आला. तसेच ओपन आऊटडोअर कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांक किशोर कारेकर व द्वतीय क्रमांक सारा पाटील, तृतीय क्रमांक उद्धव पटवर्धन यांना देण्यात आला. मे महिन्याच्या उष्णतेत सुद्धा झाडांना आपल्या कुटुंबाप्रमाणे जपतात. त्यांचे कौतुक व्हावे आणि बाग कामाची आवड ही सर्वांमध्ये वाढावी या हेतून ही स्पर्धा भरविण्यामागे होता. साधारण १५ स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. त्यातून एकूण ५ बक्षिसे देण्यात आली. बक्षिस वितरण उर्मिला घोसाळकर, अध्यक्ष श्रीकांत भुर्के, ज्येष्ठ सदस्य अंजली इंदुलकर आणि धरमसी काका चौहान यांच्या हस्ते करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.