इंजिन बिघडल्यामुळे रेल्वे गाड्या विलंबाने

इंजिन बिघडल्यामुळे रेल्वे गाड्या विलंबाने

Published on

इंजिन बिघाडामुळे रेल्वे गाड्या विलंबाने

निवसर ते आडवली जवळील घटना ; ऐन दिवाळीत चाकरमान्यांचा खोळंबा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ ः दिवा ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेसचे इंजिन निवसर ते आडवली या टप्प्यात बिघडल्यामुळे बुधवारी (ता. ३०) सायंकाळी मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या जनशताब्दी तसेच तेजस एक्सप्रेस या महत्त्वाच्या गाड्यांना फटका बसला. यापैकी जनशताब्दी एक्सप्रेस तीन तासापेक्षा अधिक तर तेजस एक्सप्रेस दोन तास विलंबाने धावत होती. एकूण पाच गाड्यांचे वेळापत्रक यामुळे बिघडले.
या संदर्भात उपलब्ध माहितीनुसार दिवा ते सावंतवाडी दरम्यान धावणारी एक्सप्रेस गाडी ही बुधवारी सुमारे तिन तास उशिराने धावत होती. मडगाव ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस बुधवारी सायंकाळच्या सुमारास आडवली स्थानकानजीक आली असता दिव्यावरून सावंतवाडीला जाण्यासाठी आलेल्या एक्सप्रेसचे इंजिन बिघडले. त्यामुळे जनशताब्दी अडकून पडली. थांबलेली दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस नियमित मार्गातून बाजूला करण्याच्या कामात जनशताब्दी एक्सप्रेस तीन तास रखडली. दिवा ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेसचे इंजिन बिघडल्यामुळे आधीच विलंबाने धावत असलेली गाडी सावंतवाडीच्या दिशेने पाच तास ३९ मिनिटे इतकी उशिराने धावत होती. इंजिन बिघडलेल्या या गाडी शिवाय लोकमान्य टिळक टर्मिनस वरून त्रिवेंद्रमच्या दिशेने धावणारी नेत्रावती एक्सप्रेस जवळपास दोन तास उशिराने धावत होती. पनवेल ते सावंतवाडी दरम्यान धावणारी विशेष गाडी या घटनेमुळे सहा तास उशिराने धावत होती. मडगाव ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस देखील एक तास ५३ मिनिटे विलंबाने धावत होती.
------
चाकरमान्यांचा खोळंबा

दिवाळीच्या सुटया सुरु झाल्यामुळे मुंबईकर चाकरमानी कोकणाकडे परतू लागले आहेत. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना प्रचंड गर्दी आहे. वातावरणातही उष्मा असल्यामुळे प्रवाशांची कसरत सुरु आहे. या परिस्थितीत अचानक गाड्या विलंबाने धावत असल्यामुळे ऐन दिवाळीत चाकरमान्यांचा खोळंबा झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com