अपरांत हॉस्पिटलच्या रांगोळी स्पर्धेत रेवती भोसले प्रथम

अपरांत हॉस्पिटलच्या रांगोळी स्पर्धेत रेवती भोसले प्रथम

Published on

- rat३१p१७.jpg-
P24N22439
अपरांत हॉस्पिटलमध्ये काढलेल्या रांगोळ्या

रांगोळी स्पर्धेत रेवती भोसले प्रथम

अपरांत हॉस्पिटलतर्फे आयोजन ; संध्या साळुंखे द्वितीय

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३१ : शहरातील अपरांत हॉस्पिटलने दीपोत्सवाच्यानिमित्ताने हॉस्पिटल अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत नर्स रेवती भोसले यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
हा कार्यक्रम लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर चिपळूण येथे पार पडला. या स्पर्धेचे उद्‍घाटन अस्थिविकार तज्ज्ञ डॉ. गोपीचंद वाघमारे यांच्या हस्ते झाले. रांगोळीकर संतोष केतकर हे परीक्षक म्हणून लाभले. या स्पर्धेमध्ये अपरांत हॉस्पिटल मधील बिलिंग, रिसेप्शन, पी आर डिपार्टमेंट, हाऊसकीपिंग, ऑपरेशन थिएटर, लॅब व नर्सिंग डिपार्टमेंट मधील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. सहभागी स्पर्धकांनी ‌‘स्त्री व तिचे समाजातील योगदान व प्रगती‌’, ‌‘डॉक्टरांचे समाजातील योगदान‌’, ‌‘पाणी वाचवा जीवन वाचवा‌’, ‌‘आनंदी जीवन निरोगी हृदय‌’, ‌‘दीपावलीच्या शुभेच्छा‌’ अशा अनेक विषयांवर रांगोळ्या काढल्या. रुग्णसेवेद्वारे रुग्णाच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या अपरांत हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या रांगोळ्या काढल्या होत्या. या स्पर्धेमध्ये नर्सिंग विभागाच्या नर्स रेवती भोसले प्रथम, पी. आर. विभागाच्या संध्या साळुंखे यांनी द्वितीय तर शेखर भुवड यांनी तृतीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेमधील सर्व सहभागी स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीसांचे वितरण करण्यात आले. पारितोषिक वितरण कार्यक्रम अपरांत हॉस्पिटलचे संचालक डॉ. अब्बास जबले, चंद्रकांत कुलकर्णी व परीक्षक संतोष केतकर यांचे हस्ते झाला. प्रकल्प समन्वयक डॉ. श्रद्धा जाधव यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com