खेडातील पुरातन ठेव्याची दुरावस्था

खेडातील पुरातन ठेव्याची दुरावस्था

Published on

सकाळ विशेष

- rat३१p६.jpg-
२४N२२३९२
खेड ः शहरातील ग्रामपाण्याच्या कुंडाचे वेलीनी वेढलेलं प्रवेशद्वार
- rat३१p७.jpg-
P२४N२२३९३
कुंडाच्या जलस्त्रोताजवळ परिसरात वाढलेले गवत.
- rat३१p८.jpg-
P२४N२२३९४
गरम पाण्याच्या कुंडात साचलेला गाळ.
- rat३१p९.jpg-
P२४N२२३९५
गरम पाण्याच्या कुंडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाढलेले गवत. (सिद्धेश परशेट्ये : सकाळ छायाचित्रसेवा)
----------

खेडमधील पुरातन ठेव्याची दुरावस्था

गरम पाण्याचे कुंड झाडीने वेढले ; कुंडात साचला गाळ, सुशोभीकरणाचा लाखोंचा खर्च वाया
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ३१ : शहराच्या मध्यवर्ती भागात संरक्षित हरितपट्टा असून त्या पट्टयात पुरातन व पवित्र गरम पाण्यांचे कुंड आहे. या कुंडामध्ये असलेल्या पाण्याला महत्व प्राप्त झाले असून त्या भागाचा विकास करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न केले. परंतू गेल्या १५ वर्षात या पवित्र कुंडाकडे सर्वच राजकीय पक्ष अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत. परिणामी याठिकाणी समाजकंटकांनी तीर्थक्षेत्राला आपला अड्डा बनविले आहे. त्यामुळे या ऐतिहासिक ठेव्याची दुरवस्था होत आहे.
खेड शहराला प्राचीन, ऐतिहासिक, पौराणिक, वारसा असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे शहरात पुरातन काळातील अनेक खुणा विविध ठिकाणी आढळून येतात. शहरातील खांबतळे, पुरातन लेणी, बंदर परिसर व तेथील शेकडो वर्षे जुन्या समाध्या, गरम पाण्यांचे कुंड, भैरी मंदिर आदी ठिकाणी फेरफटका मारल्यानंतर त्याची साक्ष पटते. परंतू ही सर्वच ठिकाणे दुर्लक्षित व अविकसित राहिली आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून शहरातील या ठिकाणांच्या विकासासाठी प्रयत्न सुरू आहे. लाखो रुपयांचा निधी गेल्या कित्येक वर्षापासून जाहीर होत आहेत. गरम पाण्याच्या कुंडाकडे इतिहास काळामध्ये जेवढे लक्षपूर्वक पाहिले जात होते तसे आधुनिक काळात पाहिले जात नसल्याची खंत जाणकार व्यक्त करीत आहेत.
खेड शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गरम पाण्याच्या कुंडाकडे जाण्याकडे पालिकेमार्फत स्वागत कमान, रेलिंग सुशोभीकरणाच्या कामामध्ये लाखो रुपये खर्च झाले आहेत. परंतू सध्याची परिस्थिती पाहता ही रक्कम कोणत्या गोष्टीवर खर्च झाली असा प्रश्न पडतो. प्रवेशद्वाराजवळ वाढलेल्या वेली, पादचारी मार्गाच्या दुतर्फा आठ ते दहा फुट उंच वाढलेली गर्द झाडी, कुंडाच्या परिसरात एक ते दोन फुट वाढलेले गवत, कचऱ्याचा खच, पवित्र कुंडाच्या पाण्यात साचलेला गाळ, परिसरात पडलेल्या रिकाम्या मद्याच्या व पाण्याच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे हे चित्र विदारक आहे.
-----
कोट
- rat३१p५.jpg-
P२४N२२३९१
संजय विचारे

तालुक्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. खेड शहरात असलेली गरम पाण्याचे कुंड हा एक पुरातन ठेवा आहे. पण राजकीय अनास्थेमुळे या कुंडाची दुर्दशा झाली आहे. हे पाणी औषधी असून याचा लाभ सर्वांनाच घेता येईल. पण पालिकेने गेल्या काही वर्षात या ठिकाणी दुर्लक्ष केले आहे. दुरुस्तीसाठी निधी खर्च केला. पण या कुंडाची स्वच्छता आणि योग्य निगराणी न ठेवल्यामुळे या गरम पाण्याच्या कुंडाचे पावित्र्य लोप पावत चालले आहे. हे पावित्र्य जपण्यासाठी पालिका आणि स्थानिक नागरिकांनी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे.
संजय विचारे, सामाजिक कार्यकर्ते, खेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com