डीबीजे मुलींचा संघ ठरला उपविजेता

डीबीजे मुलींचा संघ ठरला उपविजेता

Published on

-rat३१p१९.jpg-
OP२४N२२४४०
रत्नागिरी ः विभागीय शालेय कबड्डी स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या मुलींच्या संघासोबत संस्थेचे चेअरमन मंगेश तांबे, जिमखाना समिती प्रमुख शांताराम जोशी आदी.
-------------
‘डीबीजे’ मुलींच्या संघ उपविजेतेपद

कोल्हापूर विभागीय शालेय कबड्डी स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण : कोल्हापूर विभागीय शालेय कबड्डी स्पर्धा नुकत्याच झाल्या. या स्पर्धेत चिपळुणातील डीबीजे कॉलेजच्या मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकाविले. कोल्हापूर येथील विभागीय शालेय कबड्डी स्पर्धेत कोल्हापूर शहर व ग्रामीण-२, सांगली शहर व ग्रामीण-२, इचलकरंजी, सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी असे एकूण आठ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत आपल्या सांघिक खेळाची चमक दाखवित डीबीजे मुलींच्या संघाने उपविजेतेपद प्राप्त केले. अनुराधा भिसे हिच्या नेतृत्वाखालील संघात ऋतुजा कदम, चिन्मयी ढगळे, समिक्षा पवार, गौरी पवार, नेत्रा शिंदे, ऋतिका शिंदे, स्वरांजली जाधव, श्रावस्ती कांबळे, सृष्टी महाडिक, वेदिका गुरव, सिया लाड यांचा सहभाग होता. नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, जिमखाना समिती प्रमुख शांताराम जोशी, पदाधिकारी, प्राचार्य माधव बापट, रजिस्ट्रार अनिल कलकुटकी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संघातील विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com