महावितरणच्या ठेकेदाराने वडाची झाडे उपटली
-rat३१p२१.jpg
P२४N२२४४२
- गुहागर ः केबलसाठी चर खणताना काढून टाकलेली वडाची झाडे.
----------
महावितरणच्या ठेकेदाराकडून झाडांचे नुकसान
केबल टाकतानाचा प्रकार ; ‘साथ साथ’ची भरपाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ३१ : तालुक्यातील वेळणेश्वर वाडजई येथील साथ साथ चारिटेबल ट्रस्टने रस्त्याच्या बाजूला वनसंवर्धन दिनाचे औचित्य साधून सुमारे दीडशे झाडे लावली होती. महावितरणची केबल टाकताना ठेकेदाराने कोणतीही परवानगी न घेता जेसीबीने चर खणत असताना ही झाडे काढून फेकून दिली.
याबाबत साथ साथ चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त शरद जोशी यांनी सांगितले, आमच्या ट्रस्टतर्फे पर्यावरण रक्षणासाठी व पादचाऱ्यांना सावली मिळावी म्हणून आम्ही वेळणेश्वरमध्ये जुलै २०२३ मध्ये शंभर वडाची झाडे ब्लास्टिंग करून खड्डे खणून रस्त्याच्या कडेला वन संवर्धन दिन याचे औचित्य साधून लावली होती. त्यातली काही झाडे अतिपावसामुळे मेली. जुलै २०२४ ला आम्ही दीडशे रुपयाला एक अशी साठ झाडे, सात फुट उंचीची देवरूख येथील नर्सरीतून आणून नवीन लावली. या प्रकल्पासाठी तीन लाख रुपये खर्च केले. दुर्दैवाने केबल टाकायच्या कामासाठी जेसीबीने चर खणत असताना पर्यावरणासाठी अतिशय मौल्यवान असलेली झाडे उखडून फेकून दिली. याला सर्वस्वी महावितरण जबाबदार आहे. ठेकेदाराला सांगून या सर्वांची भरपाई करून सव्वाशे ते दीडशे झाड आम्हाला वडाची लावून द्यावीत. याबाबत ग्रामपंचायत, पर्यावरण मंत्रालय येथे पत्र व्यवहार करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

