नाराज उदय बनेंच्या मनधरमीसाठी बाळ माने भेटला

नाराज उदय बनेंच्या मनधरमीसाठी बाळ माने भेटला

Published on

उदय बनेंची भूमिका गुलदस्त्यातच

सहकार्याची विनंती; मनधरणीसाठी मानेंनी घेतली भेट?

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ : नाराज उदय बने यांची मनधरणी करण्यासाठी अखेर उबाठाचे उमेदवार बाळ माने यांनी निवास्थानी भेट घेतल्याची जोरदार चर्चा आहे. आपल्याला या निवडणुकीत सहकार्य करावे, अशी विनंती बाळ माने यांनी केली. परंतु बने यांनी ही विनंती धुडकावली. आज दिवाळीचा सण आहे, माझ्या घरी आलात फराळ करा. मात्र मला राजकारणावर काहीच बोलायचे नाही, अजून माझी भूमिका ठरलेली नाही, असे बने यांनी स्पष्ट केल्याचे खात्रीलायक वृत्ते आहे. त्यामुळे बनेंची भूमिका अजून गलदस्त्यातच आहे.
उदय बने हे शिवसेनेचे निष्ठावंत म्हणूनच ४५ वर्षे काम करत आहेत. त्यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आणि पक्षासाठीही त्यागही केल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु त्यांनी पक्षावर कधीच जाहीर नाराजी व्यक्त केली नव्हती. फुटीनंतरची उबाठा शिवसेनेची पहिलीच निवडणूक आहेत. अनेक दिग्गज शिंदे शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे उदय सामंत यांना टक्कर देणारा तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात उबाठा होती. उदय बने या निष्ठावंताचे नाव इच्छुकांमध्ये पुढे होते. अगदी बने यांची उमेदवारी निश्चित झाली आणि त्यांना मुंबईला बोलावणेही झाले. या दरम्यान भाजपमध्ये नाराज असलेले बाळ माने शिवसेनेत येण्यासाठी फिल्डिंग लावून होते. त्यांची मातोश्रीशी चर्चाही झाली होती. उदय बने आणि बाळ माने दोघेही मुंबईत होते. माने यांनी बनेंना उमेदवारीबाबत शुभेच्छाही दिल्या. परंतु आयत्यावेळी उदय बनेंना डावलून पक्षाने बाळ माने यांचा पक्षात प्रवेश करून त्यांना उमेदवारी दिली. एवढ्या दिवसात उबाठाच्या एकाही नेत्याने बने यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. हे सर्व त्यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. नाराज बनेंची मनधरणी करण्यासाठी आज बाळ माने यांनी निवास्थानी भेट घेतल्याचे समजते.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com