कांदळगावकर सत्तेत असूनही अपयशी

कांदळगावकर सत्तेत असूनही अपयशी

Published on

22549

कांदळगावकर सत्तेत असूनही अपयशी
मंदार केणी ः पालिका निवडणूक ''धनुष्यबाणा''वर लढवून दाखवा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३१ : ठाकरे शिवसेनेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होताच शिंदे शिवसेनेत जाऊन गद्दारी सिद्ध केली आहे. कांदळगावकर यांचा नीलेश राणे यांना कायम विरोध होता, त्यामुळे ते भाजपऐवजी शिंदे गटात गेले; मात्र आता नीलेश राणेही शिंदे गटात आले आहेत. शहरातील विकासकामे रखडल्याचे ते सांगतात; मात्र त्यांच्या नाकर्तेपणामुळेच कामे रखडली. सत्तेत असताना सुद्धा ते अपयशी ठरले. त्यामुळे पुढील मालवण पालिका निवडणुकीत त्यांनी उमेदवारीचे तिकीट मिळवून धनुष्यबाणावर लढून दाखवावे, असे आव्हान ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते व माजी नगरसेवक मंदार केणी यांनी दिले.
येथील ठाकरे शिवसेना शाखेत आज पत्रकार परिषद झाली. यावेळी रवींद्र तळाशीलकर, तपस्वी मयेकर, उमेश चव्हाण, सिद्धार्थ जाधव, दत्ता पोईपकर आदी उपस्थित होते. श्री. केणी म्हणाले, ‘‘नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर गेल्या अडीच वर्षांत कांदळगावकर यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी किती योगदान दिले? ज्यांनी कांदळगावकर यांना शिवसेनेचे तिकीट देण्याची शिफारस केली, ज्या सामान्य लोकांनी कशाचीही अपेक्षा न ठेवता निवडून दिले, ज्या कार्यकर्त्यांनी निवडून येण्यासाठी प्रयत्न केले, त्यांच्या विश्वासास कांदळगावकर किती पात्र ठरले? नगराध्यक्ष बनल्यावर आपल्या पक्षाला ताकद देण्याची गरज असते; मात्र पदभार संपल्यावर कांदळगावकर यांनी ठाकरे शिवसेनेशी फारकत आपली कृतघ्नता दाखविली. पक्षातील गद्दारीनंतर पक्षासोबत राहण्याची गरज होती; मात्र त्यातही कांदळगावकर पात्र ठरले नाहीत.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘नगराध्यक्ष असताना कांदळगावकर हे आमदार वैभव नाईक यांच्या कामाची पद्धत, विकासकामे करण्याची ताकद याचे कौतुक करायचे, म्हणूनच विरोधी पक्षात असूनही आम्ही चार नगरसेवक शिवसेनेत आलो. आमदारांच्या कामांचा प्रत्यय आम्हालाही आला; मात्र शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी जसे नगराध्यक्ष आम्हाला वाटत होते, त्याच्या उलट स्वभावाचा प्रत्यय आम्हाला आला. कांदळगावकर यांचे पालिकेतील एकाही मुख्याधिकाऱ्याशी पटले नाही. अधिकारी, कर्मचारी यांच्याशीही पटले नाही. नगराध्यक्षपदाचे अधिकार त्यांना कधीच वापरता आले नाहीत आणि प्रशासनही चालवता आले नाही. त्यांच्या कालावधीत विकासकामांची दुर्दशा झाली. नगराध्यक्ष असताना व त्यानंतर शहरासाठी किती निधी आणला ते त्यांनी सांगावे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com