ःचिपळूण मतदारसंघात मतदानासाठी प्रशासन सज्ज
-ratchl१९१.jpg
२४N२६२९३
ः चिपळूण ः मतदान केंद्रावर मतपेट्या रवाना होताना अधिकारी व कर्मचारी.
---------------
चिपळूण मतदारसंघात प्रशासन सज्ज
मतपेट्या केंद्रावर रवाना ; ५ हजार १७ नवमतदार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १९ ः चिपळूण विधानसभा मतदार संघात बुधवारी (ता. २०) मतदान होत असल्याने मंगळवारी संबंधित मतदान केंद्रावर मतपेट्या रवाना करण्यात आल्या. सकाळी ७ वाजल्यापासून दुपारपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. शासकीय अधिकारी, कर्मचारी, निवडणूक यंत्रणा मार्गस्थ करण्यासाठी मग्न होती. एसटी व खासगी गाड्यांच्या माध्यमातून चिपळूण मतदार संघात ३३६ मतदान केंद्रावर मतपेट्या रवाना झाल्या.
शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरूदक्षिणा सभागृहातून इव्हिएम मशिन व अन्य साहित्याचे वितरण करण्यात आले. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी विशाल भोसले व देवरूख तहसीलदार अमृता साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतपेट्या रवाना करण्यात आल्या. प्रत्येक मतदान केंद्रावर अधिकारी, कर्मचारी, पोलिस व होमगार्ड असे सहा ते सातजणांचे पथक रवाना झाले. त्यामुळे सकाळपासून युनायटडेचा परिसर गर्दीने फुलला होता. निवडणुकीच्या कामावर नेमलेले कर्मचारी विविध जबाबदाऱ्या, अधिकारी व कर्तव्ये संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेत होते. मतपेट्या सुरक्षितपणे रवाना होण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
चिपळूण विधानसभा मतदार संघात एकूण २ लाख ७६ हजार ६५ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ३४ हजार ८१३ पुरुष तर १ लाख ४१ हजार १८३ महिला मतदार असून ८५ वर्षांवरील ३ हजार ८१८ तर दिव्यांग १ हजार ७०३ मतदार आहेत. या वेळी ५ हजार १७ नवमतदारांनी नोंदणी केली आहे. या मतदार संघातील ३६ मतदान केंद्रांवर कोणतेच मोबाईल नेटवर्क नाही. १६८ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. ३३६ मतदान केंद्रांवर ३३६ पोलिस व तेवढेच होमगार्ड असणार आहेत तर प्रत्येक मतदान केंद्रासाठी पाच कर्मचाऱ्यांच्या ३६४ टीम बनवण्यात आल्या आहेत. २० ला मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी सर्व मतपेट्या युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये आणण्यात येतील. त्या ठिकाणी २१ टेबल लावण्यात आले आहेत. त्या ठिकाणी मतदान यंत्र जमा केली जातील व रात्री १० वा. पर्यंत सर्व मतपेट्या दाखल होतील. त्यानंतर त्या स्ट्राँग रूममध्ये ठेवून स्ट्राँग रूम सील केला जाईल. मतदान यंत्रणा निर्भय व सुरक्षितपणे पूर्ण होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, चोख तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्भयपणे आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी लिगाडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

