तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्यापासून रत्नागिरीत

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्यापासून रत्नागिरीत

Published on

रत्नागिरीत उद्यापासून विज्ञान प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः पंचायत समिती शिक्षण विभाग आणि मातोश्री कमलबाई विसपुते इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ५२वे रत्नागिरी तालुका विज्ञान प्रदर्शन सोमवारपासून (ता. ९) विसपुते इंग्लिश मीडियम स्कूल येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन आमदार उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन बुधवारपर्यंत (ता. ११) पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये पहिल्या दिवशी सोमवारी प्रकल्प मांडणी, १० ला विज्ञान दिंडी, प्रश्नमंजुषा व मूल्यमापन कार्यक्रमांचे नियोजन केले आहे तसेच ११ ला साहित्य मूल्यमापन, बक्षीस वितरण कार्यक्रम आहे. याचे उद्घघाटन मंगळवारी सकाळी होणार असून, या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, धनराज डी. विसपुते, संचालिका नंदा शेलार, शिक्षणाधिकारी बी. एम. कासार, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत (माध्यमिक), किरण लोहार, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com