निवड समिती सदस्यपदी ॲड. गोविंद शर्मा

निवड समिती सदस्यपदी ॲड. गोविंद शर्मा
Published on

- rat७p३५.jpg-
२५N३७०८०
ॲड. गोविंद शर्मा
---
खो-खो निवड समिती
सदस्यपदी ॲड. शर्मा
नवी दिल्लीत विश्वचषक स्पर्धा; २४ संघांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
नवी दिल्ली, ता. ७ ः महाराष्ट्र खो-खो संघटनेचे खजिनदार ॲड. गोविंद शर्मा यांची भारतीय खो-खो महासंघाने (KKFI) पहिल्यांदाच होणाऱ्या खो-खो विश्वचषकासाठी भारतीय खो-खो संघाच्या निवड समिती सदस्यपदी नियुक्ती केली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा १३ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर होणार असून, २४ देशांचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
भारतीय संघाची अंतिम निवड प्रक्रिया दिल्ली येथे सुरू असलेल्या सराव शिबिरातून भारताच्या खो-खो पुरुष आणि महिला संघाची अंतिम निवड ८ आणि ९ जानेवारीला नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे होणार आहे. या निवडीसाठी निवड समिती सदस्य म्हणून ॲड. गोविंद शर्मा यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगरचे निवासी आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व संभाजीनगर जिल्हा खो-खो संघटनेचे माजी सचिव ॲड. गोविंद शर्मा यांचा क्रीडा क्षेत्रातील दीर्घ अनुभव आणि योगदान या नियुक्तीमागील महत्त्वाचे घटक आहेत. २०१६ पासून त्यांनी भारतीय खो-खो महासंघाच्या पुरस्कार समिती सदस्य म्हणून काम केले आहे. या निवडीबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव प्रा. डॉ. चंद्रजित जाधव, जिल्हा खो-खो असोसिएशन अध्यक्ष समीर मुळे, सचिन गोडबोले आणि बालाजी सागर किल्लारीकर आदींनी ॲड. शर्मा यांचे अभिनंदन केले आहे. या निवड समितीमध्ये गोविंद शर्मा, एम. सीतारामी रेड्डी, उपकार सिंग विर्क, सुषमा गोळवलकर, एस. एस. मलिक, डॉ. मुन्नी जून, नितुल दास, वंदना पी. शिंदे, आनंद पोकार्डे यांचा समावेश आहे. या समितीवर भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष व सरचिटणीस पदसिद्ध म्हणून काम पाहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com