राजापूरवरील टंचाईची साडेसाती कायम

राजापूरवरील टंचाईची साडेसाती कायम
Published on

rat१८p२९.jpg
५१९७२
राजापूरः बांधकाम झालेले नवे धरण.
-----------
राजापूरवरील टंचाईची साडेसाती कायम
कोदवलीच्या नव्या धरणाचे काम अर्धवट; तांत्रिक बाबीचे कारण
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १८ः गेल्या कित्येक वर्षापासून राजापूरवासियांना भेडसावणारी एप्रिल-मे मधील पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी कोदवली येथील सायबाच्या धरणाच्या येथे नवीन पर्यायी धरणाचे बांधकाम करण्यात येत आहे; मात्र, सुरवातीला निधीअभावी रखडलेले काम आता तांत्रिक बाबींमध्ये अडकल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी दोन महिन्यांमध्ये धरणाचे बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याने शहरावर दरवर्षीप्रमाणे टंचाईची तलवार कायम आहे.
कोदवली येथे बांधलेले सायबाचे धरण गेल्या १४८ वर्षापासून शहराचा मुख्य जलस्रोत राहिले आहे; मात्र, या धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा होत नसल्याने शहराला दरवर्षी एप्रिल-मेमध्ये पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे दरवर्षीच्या पाण्याच्या समस्येसह भविष्यामध्ये शहराचा होणारा विस्तार आणि वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन जुन्या धरणाच्या खालच्या बाजूला नव्या धरणाची उभारणी केली जात आहे. या धरणाच्या कामासाठी माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांच्या पाठपुराव्यातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. धरण उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या निधीतून धरणाच्या सतरा झडपे वा गाळ्यासह जोडरस्ता, विजेची सुविधा यांसह अन्य स्वरूपाच्या कामांचा समावेश आहे.
गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये धरणाचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले; मात्र उर्वरित कामासाठी सुमारे आठ कोटी रुपयांची आवश्यकता होती; मात्र हा निधी उपलब्ध झालेला नाही. त्यानंतर पाठपुरावा केल्यानंतर निधी मंजूर झाला; मात्र आता धरणाचे उर्वरित काम तांत्रिक बाबीमध्ये अडकले असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून दिली जात आहे.

चौकट
दृष्टिक्षेपात सायबाचे नवीन धरण
लांबीः ५० मीटर
उंचीः ६.४८ मीटर
भिंत रूंदीः १० मीटर
झडपे वा गाळेः १७
माथा उंचीः ९७ मीटर
संभाव्य पाणीसाठाः १०३ सहस्र घनमीटर
पाण्याची पाईपलाईनः १४ इंच
---------
दृष्टिक्षेपात जुने धरण
बांधकामः १८७८
बांधकामाचे स्वरूपः दगडी बांधकाम
धरणाची लांबीः ३० मीटर
उंचीः ४.५० मीटर
माथा रूंदीः ३.०० मीटर
पाण्याची पाईपलाईनः ८ इंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com