आरवलीतील सेवा रस्त्याकडेला नाले बांधण्यास सुरवात

आरवलीतील सेवा रस्त्याकडेला नाले बांधण्यास सुरवात
Published on

-rat२६p५.jpg-
P२५N६०००५
आरवली ः सेवारस्त्याच्या कडेला नालेबांधकामास सुरवात झाली आहे. (छायाचित्र: अशोक कदम, सावर्डे)
----
आरवलीतील सेवा रस्त्याकडेला नाले बांधकाम
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २६ : संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील चौपदरीकरण रस्त्याच्या पश्चिमेकडील सेवारस्त्याच्या नाले बांधकामास सुरवात झाली आहे. रस्त्याच्या बाजूस अंदाजे दोन हजार फूट लांब व चार फूट रूंद आकाराचा नाला बांधण्यात येणार आहे. हा नाला स्टेट बँकेच्या शाखेपासून ते गरम पाण्याच्या कुंडापर्यंत बांधण्याचे नियोजन आहे. नाला बांधकाम पूर्ण झाले की, पश्चिमेकडील सेवारस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाईल. ही कामे पूर्ण झाल्यास येथील सेवा रस्त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास थांबेल. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
महामार्गाच्या पाश्चिमेकडील रत्नागिरी-चिपळूण सेवारस्त्याचे पावसाळ्यापूर्वी काँक्रिटीकरण व्हावे तसेच नाल्याची कामे व्हावीत, अशी मागणी करण्यात येत होती. महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये रस्ते महामंडळाने आरवली येथे माखजन व कुचांबे परिसरासाठी उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. पुलाच्या खालून पूर्व बाजूस कुचांबे, मुरडव, कुंभारखाणी बुद्रुक, राजिवली, येडगेवाडीला जाण्यासाठी, तर पश्चिमेला कोंडीवरे, माखजन, बुरबांड, कासे, करजुवे आदी गावांसाठी सेवारस्ता तयार करण्यात आला आहे. उड्डाणपूल व सेवारस्त्याचे काम पावसाळ्याच्या तोंडावर घाईघाईत केल्याने सेवारस्त्याचा बोजवारा उडाला होता. रस्त्याचे व्यवस्थित मजबुतीकरण झालेले नव्हते. त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. तसेच योग्य सपाटीकरण नसल्याने अवजड वाहने जीव मुठीत धरून चालवावी लागत होती. रस्त्याला नाले काढलेले नव्हते. सेवारस्त्याची दुरुस्ती होत असल्याने प्रवासी व वाहनचालकांची समस्या मिटणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com