

rat२५p५२.jpg-
N६६२५४
चिपळूण ः कचरा प्रकल्पाची कोसळलेली भिंत.
-------------
कचरा प्रकल्पाची संरक्षक भिंत कोसळली
चिपळुणात पावसाचा फटका ; नगरपालिकेचे नुकसान
चिपळूण, ता. २५ ः शहरातील शिवाजीनगर येथील डोंगर माथ्यावर असलेल्या नगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पाभोवतीची संरक्षक भिंत मुसळधार पावसात कोसळली. ४५ मीटर लांब व दोन फूट रुंद अशी ही संरक्षक भिंत कोसळली असून या घटनेमुळे नगरपालिकेचे मोठे नुकसान झाले आहे.
पालिकेने घनकचरा प्रकल्पासाठी २००६ मध्ये साडेसहा एकर जागा शिवाजीनगरच्या डोंगर माथ्यावर खरेदी केली होती. त्यानंतर काही वर्षातच ही जागा पालिकेने विकसित करून सभोवती संरक्षक भिंत व अंतर्गत रस्ते तयार केले. साधारण २०११ दरम्यान उभारलेली ही संरक्षक भिंत ढासळू लागली होती. सध्या सुरू असलेल्या पावसात संरक्षित भिंतीतील ४५ मीटरचे बांधकाम पूर्ण जमिनदोस्त झाले आहे. संरक्षक भिंतीचे तुटलेले साहित्य हटविण्याचे काम सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.