सावंतवाडीत उद्या
दिव्यांग मेळावा

सावंतवाडीत उद्या दिव्यांग मेळावा

Published on

सावंतवाडीत उद्या
दिव्यांग मेळावा
सावंतवाडी ः हेलन केलर जयंतीनिमित्त रविवारी (ता.१) येथील नॅब नेत्र रुग्णालय (भटवाडी) येथे दृष्टिबाधित व्यक्तींसाठी विशेष स्नेह मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावरील नॅब सभागृहात सकाळी ११ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या सर्व दृष्टिबाधित व्यक्तींना येण्या-जाण्याचा प्रवास खर्च देण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी जास्तीत-जास्त दृष्टिबाधित व्यक्तींनी उपस्थित राहावे, असे आवाहन नॅब सिंधुदुर्गचे अध्यक्ष अनंत उचगावकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
----------------
‘एक दिवस तरी
वारी अनुभवावी’
मालवण ः आषाढ शुद्ध एकादशीनिमित यंदा संत तुकाराम महाराज पालखी वारी सोहळा देहू ते पंढरपूर दरम्यान १८ जून ते ६ जुलै दरम्यान आहे. यात २४ जूनला ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. पालखी सोबत पुणे ते पंढरपूर या संविधान समता दिंडीतही सहभागी होऊ शकतो. कार्यक्रम संयोजक श्यामसुंदर महाराज सोन्नर, शरद कदम, अविनाश पाटील, वर्षा देशपांडे, विशाल विमल, राजाभाऊ अवसक, दत्ता पाकिरे, महादेव पाटील, साथना शिंदे, माया वाकोडे, भरत महाराज घोगरे, दीपक देवरे, सुमित प्रतिभा संजय, सरस्वती शिंदे, नागेश जाधव असणार आहेत. अधिक माहितीसाठी विशाल विमल यांच्याशी संपर्क साधावा.
-----------------
अवजड वाहनांना
विरण पुलावर बंदी
मालवण ः बेळणे मुख्य मार्गावर विरण परिसरात मोठ्या प्रमाणात रहदारी व वाहतूक असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरून अवजड वाहनांना पूर्णतः बंदी केली आहे. तूर्तास या पुलावरून मोटारसायकल, रिक्षा व लहान चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. पुलाच्या संरक्षक भिंतीचे अंदाजपत्रक त्वरित तयार करून बांधकामास सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती यावेळी उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. पोईप नाका व मसदे निठा येथे पोलीस प्रशासनाने बॅरिकेड्स लावून अवजड वाहनांना बंदी घातली आहे.
----------------
‘तोडलेली झाडे
तात्काळ हटवा’
सावंतवाडी ः येथील पालिकेने महावितरण कंपनीला एक नोटीस काढली आहे. त्यात म्हटले आहे की, ‘पावसाच्या काळात शहारत वीजपुरवठा सुरळीत ठेवावा. विजवाहिन्यांना अडथळा ठरणारी झाडे व फांद्या तोडून घ्यावीत. तोडून झाल्यानंतर ती रस्त्यावर न टाकता त्यांची योग्य ती विल्हेवाट लागली. तसे न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. या नोटीशीनंतरही झाडे तशीच रस्त्यावर ठेवलेली दिसून येत आहेत.’
-----------------
झोळंबे येथे उद्या
रक्तदान शिबिर
दोडामार्ग ः झोळंबे येथील शिवशक्ती ग्रामविकास बहुद्देशीय मंडळातर्फे झोळंबे व्यायामशाळा येथे रविवारी (ता.१) सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रक्तदात्यांनी जगदिश गवस यांच्याकडे नाव नोंदणी करावी. शिबिरात झोळंबे परिसरातील युवक, युवतींसह महिला व ग्रामस्थांनी रक्तदान करावे, असे आवाहन शिवशक्ती ग्रामविकास बहुद्देशीय मंडळाचे अध्यक्ष दिलीप घोगळे, उपाध्यक्ष मुन्ना गवस, सचिव हेमंत सावंत यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com