
78717
गुडघाभर चिखलात विद्यार्थ्यांतर्फे तरवा लावणी
पाडलोसमध्ये ‘बांधावरची शाळा’; शाळा क्र. १, २, ३ च्या उपक्रमास प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २० ः ‘बांधावरची शाळा’ या अभिनव शैक्षणिक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पारंपरिक वर्ग खोल्यांच्या बाहेर थेट शेतात किंवा ग्रामीण परिसरात शेतीचा अनुभव मिळतो. जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या या उपक्रमाअंतर्गत पाडलोस शाळा क्रमांक १, २ व ३ मधील विद्यार्थ्यांना थेट बांधावर चिखलात नेऊन शेतीविषयक माहितीसह तरवा काढणी, लावणीचे प्रात्यक्षिक दाखविले.
पाडलोस केणीवाडा येथील शेतकरी संदीप कळंगुटकर यांच्या शेतात विद्यार्थ्यांना भात लावणी, नांगरणी, पिकांची वाढ, तरवा काढणी यांसारखी शेतीची कामे प्रत्यक्ष दाखविली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेजल गावडे, मयुरी कुबल, पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, मुख्याध्यापक विजय गावडे, अस्मिता आरोसकर, अमोल प्रभूझाट्ये, उपशिक्षक अनिल वरक, अंगणवाडी सेविका अश्विनी साळगावकर, शाळा मदतनीस विलासिनी नाईक, अंगणवाडी मदतनीस प्रचला पटेकर, पालक संतोष आंबेकर, सुधीर गावडे आदी उपस्थित होते.
विजय गावडे म्हणाले की, ‘‘प्रत्यक्ष शेतात गेल्याशिवाय शेतकऱ्याचे कष्ट समजत नाहीत. कायमस्वरुपी निसर्गाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकऱ्याचे जीवनमान समजून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आठवड्यातील दोन तास तरी शेतीत काम करावे.’’ मयुरी कुबल यांनी सूत्रसंचालन केले. अश्विनी साळगावकर यांनी प्रास्ताविक केले. विलासिनी नाईक यांनी आभार मानले. पाडलोस ग्रामपंचायतीतर्फे विद्यार्थ्यांना आहार पुरविला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.