अनियमित एसटीचा विद्यार्थ्यांना फटका
78772
अनियमित ‘एसटी’चा विद्यार्थ्यांना फटका
पाडलोस बालसभेत खंत; चुकीच्या फलकामुळेही गोंधळ
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २० ः मडुरा हायस्कूलमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना गेले अनेक दिवस अनियमित एसटीचा फटका बसत आहे. दोन दिवसांपूर्वी नेहमीचा फलक नसल्यामुळे विद्यार्थ्यांत गोंधळ निर्माण झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. शाळा सुटण्याच्या वेळेवर एसटी यावी, अशी मागणी उपस्थित विद्यार्थ्यांनी पाडलोस येथे आयोजित बालसभेत केली.
पाडलोस देऊळवाडी येथे पंचायत राज संस्था आणि समुदाय आधारित संघटनाअंतर्गत ओम गणेश बालसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ओम गणेश बाल सभा अध्यक्ष सानिका गावडे, सचिव गौतमी केणी, कोषाध्यक्ष साईश नाईक, सहसचिव दिशा पाडलोस्कर, ग्रामसंघ सीआरपी नेहा नाईक, लिपिका शीतल गावडे, सभासद लक्ष्मी गावडे, आशा सेविका विजया गावडे, पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक तसेच गावातील विद्यार्थी उपस्थित होते.
स्वागत गीताने बालसभेची सुरुवात करण्यात आली. आरोग्यविषयक माहिती, मोबाइलचे परिणाम, ‘गुड टच, बॅड टच’ या संदर्भात विजया गावडे व नेहा नाईक यांनी माहिती दिली. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी बालसभा आयोजित करण्यात येणार असल्याचे शीतल गावडे यांनी सांगितले.
ओम गणेश बाल सभेचे सूत्रसंचालन मानवी गावडे यांनी केले. सानिका गावडे यांनी प्रास्ताविक केले. लक्ष्मी गावडे यांनी आभार मानले.
-------------------
एसटीचा नेमका मार्ग कोणता?
नेहमी ‘सावंतवाडी पाडलोस मार्गे सातार्डा’ असा फलक असणारी एसटी बस नेहमी येते. मात्र, दोन दिवसांपूर्वी ‘सावंतवाडी बांदा निगुडे सातोसे’ असा फलक असलेली एसटी बस आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. मुख्य म्हणजे ही बस त्या मार्गे न जाता पाडलोस मार्गे पुढे रवाना झाली, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.