निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास आढावा बैठकीचा फार्स

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास आढावा बैठकीचा फार्स

Published on

kan184.jpg
92344
अनंत पिळणकर

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
विकास आढावा बैठकीचा फार्स
अनंत पिळणकर यांची टीका
फोंडाघाट, ता. १८ : नवीन कुर्ली ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यानी नागरी सुविधा विकास आढावा घेतली. पण
बैठकीचा केवळ फार्स असून, हा प्रकार फक्त निवडणुकीकडे लक्ष ठेवूनच झाला आहे, अशी टीका नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केली आहे.
पिळणकर यांनी नमूद केले की, “पालकमंत्री नितेश राणे यांनी आमदार असताना १० वर्षांपूर्वी नवीन कुर्ली वसाहतीतील १३ नागरी सुविधा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते आजवर पूर्ण झाले नाही. आता ग्रामपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विकास आढाव्याचा कार्यक्रम राबविला जात आहे. ही बैठक फक्त भाजप कार्यकर्त्यांपुरती मर्यादित होती.”
श्री. पिळणकर म्हणाले, मनोज रावराणे यांनी ‘नवीन कुर्ली ग्रामपंचायत’चे नामकरण ‘नवीन कुर्ली वसाहत ग्रामपंचायत’ करण्याची सूचना मांडल्याचे समजते. मात्र या सूचनेला स्थानिक नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला असून, जर असे नामकरण झाले तर ग्रामस्थांच्या सहभागाने जनआंदोलन उभारले जाईल.
मागील ३५ वर्षे नवीन कुर्ली ग्रामपंचायत होऊ नये यासाठीच तुळशीदास रावराणे आणि नंतर त्यांचे पुत्र मनोज रावराणे यांनी अडथळे निर्माण केले होते. प्रशासकीय पातळीवर ग्रामपंचायत होऊ नये यासाठी त्यांनी लेखी पत्रव्यवहारही केला होता, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. गरज पडल्यास हे पुरावे सार्वजनिक करू, असा इशाराही पिळणकर यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com