''संविधान'' समूहगान विश्वविक्रमात श्रिया माणगावकर यांचा सहभाग
swt1821.jpg
92417
श्रिया माणगावकर
‘संविधान’ समूहगान विश्वविक्रमात
श्रिया माणगावकर यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कोल्हापूरच्या दसरा चौकात ‘हम भारत के लोग’ या संकल्पनेखाली सोळाशेहून अधिक कलाकारांनी भारतीय संविधानातील प्रस्ताविकेचे २० विविध भारतीय भाषांमध्ये समूहगायन करत एक अनोखा विश्वविक्रम प्रस्थापित केला. या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षिका श्रिया माणगावकर यांनीही सहभाग घेऊन जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, जिल्हा प्रशासन तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि अश्वघोष कल्चर फाउंडेशन यांच्यावतीने हा भव्य कार्यक्रम पार पडला. तळवडे येथील ब्लूमिंग बड्स प्री प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षिका असलेल्या सौ. माणगावकर यांनी संस्कृत भाषेतील संविधान गायनात आपले योगदान दिले.
लवकरच त्यांना या योगदानाबद्दल पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे आणि जिल्हाधिकारी अमोल हेडगे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. तीन तासांहून अधिक काळ चाललेल्या या अविस्मरणीय सोहळ्याला दसरा चौकात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.