दापोली बसस्थानकाची दयनीय अवस्था
-rat१८p१८.jpg-
२५N९२३७०
बसस्थानकाच्या आवारात मोकाट गुरांचा वावर
-rat१८p१९.jpg-
P२५N९२३७१
बसस्थानकाला मनोरुग्णांनी घरच केलं आहे.
-------
दापोली बसस्थानकाची दयनीय अवस्था
कचऱ्यामुळे दुर्गंधी ; मोकाट गुरे, मनोरुग्णांमुळे त्रास, प्रवासी त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १८ ः दापोली एसटी बसस्थानकातील समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या समस्यांकडे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रमुख बसस्थानक म्हणून ओळख असलेल्या दापोली आगाराची सध्याची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले. आवाराला रंगरंगोटी करण्यात आली आणि समोरील संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले; मात्र ठेकेदाराच्या उदासीनतेमुळे हे काम अद्याप अपूर्ण असून त्याचा फटका थेट प्रवाशांना बसत आहे.
सुलभ शौचालयासमोरील मोकळ्या जागेत बांधकामाचे उरलेले साहित्य अनेक महिन्यांपासून पडून आहे. या ठिकाणी आता झुडपे उगवली असून, काहीजण या ठिकाणी कचरा टाकत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मुख्य फलाटावर टाकलेली रेती प्रवाशांच्या वर्दळीमुळे सगळीकडे पसरली असून, त्यामुळे पाय घसरून अपघात होण्याची भीती चालकांनी व्यक्त केली आहे. स्थानकप्रमुखांच्या कार्यालयात रंगाचे डबे व कागदपत्रांचे गठ्ठे अडथळा ठरत असून, कर्मचारी त्रासदायक परिस्थितीत काम करत आहेत. नव्याने बसवलेली प्रवासी बाकडी धूळ आणि कचऱ्याने भरलेली आहेत. स्थानकातील कोपऱ्यांत रिकाम्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे रॅपर्स दिसून येतात, ज्यामुळे अस्वच्छता वाढली आहे. बसस्थानकातील सर्वात मोठी समस्या म्हणजे मनोरुग्ण आणि मोकाट जनावरे. सध्या पाच ते सहा मनोरुग्ण अनेक दिवसांपासून बसस्थानकात वास्तव्यास आहेत. हे सर्वजण बसस्थानकातच नैसर्गिक विधी करत असून, स्वच्छतेचा अभाव आणि अन्नाचे अवशेष येथेच फेकले जात असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
फेकलेल्या अन्नामुळे उनाड कुत्री आणि गुरेही थेट फलाटावर शिरत आहेत. अनेकदा कुत्री प्रवाशांच्या बाकांवर बसलेली दिसतात, तर काहीवेळा प्रवाशांवर झेप घेतात. गुरे फलाटावरच ठाण मांडून बसत असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे प्रवाशांना ना सुरक्षितता मिळते ना स्वच्छता. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व प्रवासी संघटनांनी या संदर्भात वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या आहेत; मात्र, अद्याप एसटी प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
----------
कोट
कामासाठी म्हणून दाभोळ ते दापोली आणि परत प्रवास करताना आम्ही बसस्थानकात येतो; मात्र इथली अस्वच्छता, कुत्र्यांचा त्रास आणि मनोरुग्णांचे अनपेक्षित वर्तन यामुळे आम्हाला सतत भीती वाटते. महिलांसाठी हे वातावरण सुरक्षित नाही.
- सारिका उजाळा, दाभोळ
कोट २
बसस्थानकातील प्रवाशांच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मनोरुग्णांसंदर्भात पोलिसखात्याला पत्रव्यवहार केला आहे तसेच कुत्र्यांसादर्भात नगरपंचायतीलादेखील पत्र देऊन झाले आहे. काही घरगुती अडचणींमुळे मी रजेवर आहे; परंतु खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोलून परिसर स्वच्छ करायला सुरुवात केली आहे.
- राजेंद्र उबाळे, आगारप्रमुख, दापोली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.