वारली चित्रण कार्यशाळेला पाट हायस्कूलमध्ये प्रतिसाद

वारली चित्रण कार्यशाळेला पाट हायस्कूलमध्ये प्रतिसाद

Published on

swt2426.jpg
00265
पाटः येथील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी वारली चित्रण कार्यशाळेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी उपस्थित शिक्षक वर्ग व अन्य.

वारली चित्रण कार्यशाळेला
पाट हायस्कूलमध्ये प्रतिसाद
म्हापण, ता. २४ः पाट हायस्कूलमध्ये पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वारली चित्रण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमध्ये विकसित झालेली वारली संस्कृती, नृत्य प्रकार, रहाणीमान, निसर्गाशी जवळीक, वनौषधी खजिना, वारली घरे आणि गाजलेली वारली चित्रकला याबाबत माहिती दिली गेली.
कार्यशाळेचे उद्दिष्ट फक्त दिवाळीच्या आनंदापुरते मर्यादित न राहता, मुलांमध्ये नवनवीन शिकण्याची वृत्ती आणि चौकस बुद्धी विकसित करणे होते. विद्यार्थ्यांनी वारली चित्रणातून शुभेच्छा कार्ड्स बनविले. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे: प्रथम : ऋता मार्गी, द्वितीय : कामीनी कुंभार, तृतीय : उत्कर्षा केरकर. विशेष उल्लेख: वैष्णवी चव्हाण, हर्षित ताम्हाणेकर, ध्रृव भगत. या कार्यशाळेचे आयोजन कला शिक्षक संदीप साळसकर यांनी केले, तर एस. के. पाटील संस्था यांनी उपक्रमाचे कौतुक केले. मुख्याध्यापक राजन हंजनकर आणि पर्यवेक्षक सयाजी बोदर यांनी यशस्वी मुलांचे अभिनंदन केले. कार्यक्रमात दिपीका सामंत, यज्ञा गोसावी, जान्हवी पडते, सिद्धी चव्हाण, स्वप्नाली गोसावी यांचे सहकार्य लाभले.
----------------
swt2427.jpg
00266
वेंगुर्ले ः येथे ‘ऑपरेशन सिंदूर’ नावाचा अनोखा दिपोत्सव अशाप्रकारे साजरा करण्यात आला.

भारतीय जवानांना
वेंगुर्लेत अनोथा सलाम
वेंगुर्ले, ता. २४ः शहरातील मारुती मंदिर परिसरात दिवाळी निमित्त ‘ऑपरेशन सिंदूर’ नावाचा अनोखा दिपोत्सव आयोजित करून भारतीय जवानांना सलाम करण्यात आला. हनुमान मंदिर सेवा न्यासातर्फे दरवर्षी १,१११ पणत्या प्रज्वलित करून हा दिपोत्सव साजरा केला जातो. यापूर्वी पहलगाम येथे पर्यटकांवर पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतातर्फे ऑपरेशन ‘सिदूर’ हाती घेण्यात आले, ज्यात भारतीय जवानांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला. या उपक्रमात बहुसंख्य नागरिकांनी सहभाग घेतला आणि दिपोत्सवाचा आनंद लुटला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com