जिल्हा परिषदेवर भगवा फडकवा

जिल्हा परिषदेवर भगवा फडकवा

Published on

00414

जिल्हा परिषदेवर भगवा फडकवा

नीलेश राणे ः वेताळबांबर्डेत शिवसेनेचा विभागीय कार्यकर्ता मेळावा

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २५ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिंदे शिवसेना आता स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने आपला भगवा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकवण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे, असे आवाहन आमदार नीलेश राणे यांनी पावशी विभागाच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये केले. या मेळाव्याला शिवसेना कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी अणाव व निरुखे गावांतील ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.
पावशी विभागाच्या शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा वेताळबांबर्डे येथे झाला. यावेळी आमदार नीलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी आमदार राजन तेली, महिला सेना जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, जिल्हा सचिव दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, आनंद शिरवलकर, महिला तालुकाप्रमुख वैशाली पावसकर, युवा सेना तालुकाप्रमुख अनिकेत तेंडोलकर, विभागप्रमुख नागेश परब, महिला विभागप्रमुख मृणाल परब, शहरप्रमुख अभिषेक गावडे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख स्वरुप वाळके, माजी सभापती राजन जाधव, सोनवडे सरपंच नाजुका धुरी, आंबडपाल सरपंच महेश मेस्त्री, माजी पंचायत समिती सदस्य आनंद भोगले, कसाल सरपंच राजन परब, पणदूर सरपंच पल्लवी पणदूरकर, नगरसेवक विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर, महिला उपतालुकाप्रमुख संगीता खांडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख नागेश परब यांनी केले. जिल्हा सचिव दादा साईल यांनी सूत्रसंचालन केले.
---
आता महायुती होणे शक्य नाही!
आमदार राणे म्हणाले, ‘आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केले. मात्र, आता महायुती होणे शक्य नाही. त्यामुळे शिवसेनेला स्वबळावर निवडणूक लढवावी लागेल. प्रत्येक कार्यकर्त्याने आपला पक्ष जिंकण्यासाठी मेहनत घेणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेवर भगवा झेंडा फडकला पाहिजे, हे लक्षात घेऊन काम करा. या मतदारसंघांमध्ये झालेली कामे आमच्या माध्यमातून झाली आहेत. कारण, या ठिकाणचा आमदार शिवसेनेचा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात मजबूत करण्यासाठी भगवा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकवणे गरजेचे आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपला उमेदवार निवडून येण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com