जिल्हा पोलिस अॅक्शन मोडवर

जिल्हा पोलिस अॅक्शन मोडवर

Published on

-rat२५p२.jpg-
P२५O००३९६
रत्नागिरी ः तारांगण येथे पोलिसदलाच्या दंगल नियंत्रण पथकाद्वारे पायी गस्त घालण्यात आली.
-----
जिल्ह्यातील किनाऱ्यांवर सुरक्षेसाठी गस्त
पोलिस अॅक्शन मोडवर ; मिरकरवाडा, तारांगणातही तपासणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : दिवाळीच्या सुटीचा हंगाम असल्याने जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले आहेत. मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने आणि किनाऱ्यावरील हुल्लडबाजी रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व किनाऱ्यावर पोलिस गस्त सुरू ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर रत्नागिरी शहरातील काही ठिकाणी आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिरकरवाडा आणि तारांगण परिसरामध्ये दंगल नियंत्रण पथकाद्वारे गस्त घालण्यात आली. या वेळी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यावर कारवाई केली आणि मिरकरवाडा येथील अनेकांची चौकशी केली.
जिल्हा पोलिस सध्या अॅक्शनमोडवर आहे. दिवाळीच्या सुटीनिमित्त राज्यातून मोठ्या संख्येने पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. देवदर्शनानंतर अथांग समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. वॉटरस्पोर्ट, उंटसवारी, बाईकसवारी तसेच पोहण्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. यामध्ये अनेक अतिउत्साही तरुण स्टंट करून अन्य पर्यटकांचा जीव धोक्यात घालत आहेत तसेच ठिकठिकाणी वाहतूककोंडी होत आहे. याबाबतच्या तक्रारी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे आल्या होत्या. त्यानुसार पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या आदेशाने जिल्ह्यातील सर्व सागरीकिनाऱ्यावर पोलिसांनी गस्त सुरू ठेवली आहे. दापोली किनाऱ्यावर पर्यटकांकडून हुल्लडबाजी सुरू असल्याचा प्रकार नुकताच पुढे आला. त्यामुळे पोलिसांच्या गस्तीने पर्यटक सुरक्षित पर्यटन करतील, अशी पोलिसांची धारणा आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व किनाऱ्यावर पोलिस गस्त सुरू ठेवण्यात आली आहे.
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा आणि तारांगण परिसरामध्ये काही तरुण टोळक्याने मद्यपान करतात किंवा उशिरापर्यंत बसलेले असतात, अशा तक्रारी होत्या. त्यानुसार काल अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मिरकरवाडा जेटी व तारांगण परिसर या ठिकाणी दंगल नियंत्रण पथकचे ३० अंमलदार व रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचे २ अधिकारी, ७ कर्मचारी यांच्यासह पायी गस्त घालण्यात आली. मिरकरवाडा येथे एक व्यक्ती अंधारामध्ये उघड्यावर दारू पिताना आढळल्याने त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली. जेटी परिसरात संशयित व्यक्तींकडे विचारपूस करण्यात आली. त्यांची ओळखपत्र तपासणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com