‘माऊली गावडे वस’ भजन मंडळ स्थापन
‘माऊली गावडे वस’
भजन मंडळ स्थापन
आंबोली ः येथील श्री देवी माऊली गावडे वस भजन मंडळ जिल्हा प्रशासनाकडे नोंदणीकृत केले आहे. श्री देवी माऊली-गावडे वस भजन मंडळाच्या नामफलकाचे अनावरण मानकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाले. यावेळी आंबोली ग्रामदैवत माऊली देवस्थानचे प्रमुख गावकार श्रीकांत गावडे, शशिकांत गावडे, गावकार रामा गावडे, तानाजी गावडे, देवकार रामा गावडे, खोत सोमा गावडे तसेच पारधी आदी उपस्थित होते. यावेळी श्री देवी माऊली गावडे वस भजन मंडळाचे अध्यक्ष शिवराम गावडे, उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव दिलीप गावडे, खजिनदार सोमा गावडे, सदस्य सुदाम नाटलेकर, लक्ष्मण गावडे, गणपत गावडे, रामा गावडे, विलास गावडे, ज्ञानेश्वर गावडे, संजय गावडे, एकनाथ पारधी आदी उपस्थित होते.
....................
पणदूर येथे मंगळवारी
तिरंगी भजन सामना
पणदूर ः अमरसेन मित्रमंडळातर्फे माजी आमदार पुष्पसेन सावंत तसेच डिगसचे माजी सरपंच शंकर उफ बाळू गावडे यांच्या स्मरणार्थ पणदूर तिठा येथील गणेश मंदिर येथे मंगळवारी (ता. २८) तिरंगी भजन सामना आयोजित करण्यात आला आहे. हा सामना श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ (भरणी, बुवा विनोद चव्हाण), श्री कालिकादेवी प्रासादिक भजन मंडळ (डिगस, बुवा संदेश कसबले) आणि वडचीदेवी प्रासादिक भजन मंडळ (लिंगडाळ देवगड, बुवा संदीप लोके) यांच्यात होणार आहे. भजन रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अमरसेन सावंत मित्रमंडळाने केले आहे.
...................
साटेली भेडशीत
व्यवसायाचे धडे
साटेली-भेडशी ः महिलांनी व्यावसायिक प्रशिक्षण घेतल्यानंतर स्वत:चा व्यवसाय निवडून आर्थिक उन्नती साधावी, असे मत आरसीटी प्रशिक्षक यशवंत पारकर यांनी व्यक्त केले. साटेली-भेडशी येथील चैतन्य प्रबोधिनी येथे बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार सिंधुदुर्ग आरसीटी कुडाळतर्फे १३ दिवसांचे उद्योजकता प्रशिक्षण आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. प्रबोधिनी संस्थापिका सुप्रिया मोरजकर उपस्थित होत्या. प्रशिक्षणात २९ महिला सहभागी झाल्या होत्या. प्रतीक्षा राणे यांनी ड्रेस, गाऊन मेकिंगबाबत प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप केले. प्रशिक्षक पारकर यांनी शासकीय योजना, व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक माहिती, बाजारपेठ सर्व्हे, प्रकल्प अहवाल आदीबाबतचे प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.
...................
शालेय क्रीडा स्पर्धेत
कसाल प्रशालेचे यश
कणकवली ः जिल्हा क्रीडा विभागामार्फत आयोजित सिंधुदुर्गनगरी येथे शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत विद्यानिकेतन स्कूल कसालच्या विद्यार्थ्यांची विविध क्रीडा प्रकारात कोल्हापूर विभागीय स्पर्धांसाठी निवड झाली. जलतरण स्पर्धा ५० मीटर, १०० मीटर, २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक या तिन्ही प्रकारात स्वराज सावंत याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याची विभागस्तरासाठी निवड झाली. तसेच सातारा येथे आयोजित विभागीय जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीत करीत स्वराज सावंत याची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली. कोल्हापूर विभागीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा १९ वर्षे मुली वयोगटातून चैताली चव्हाण हिची निवड झाली आहे. ट्रॅडिशनल योगा व आर्टिस्टिक योगा या प्रकारामध्ये अस्मी राव हिने १७ वर्षांखालील मुली गटातून प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुख्याध्यापिका मेघना मणचेकर, पर्यवेक्षिका युक्ता मेस्त्री, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, चेअरमन चिराग बांदेकर, सीईओ सुषमा केणी यांनी अभिनंदन केले.
.....................
सेवानिवृत्तांसाठी
‘एसटी’ची योजना
सिंधुदुर्ग ः एसटी महामंडळातून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटीने नवीन योजना आणली आहे. या योजनेंतर्गत अशा कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर एसटीमध्ये कंत्राटी पद्धतीने नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. काही ठराविक पदांसाठी ही योजना लागू होणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून अशा निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवा करार पद्धतीने संधी देण्यात येणार असून मुंबई प्रदेशांतर्गत येणाऱ्या मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या विभागांसाठी वर्ग ३ पदातील कारागीर, सहाय्यक व चालक तसेच वर्ग ४ पदावरील सहाय्यक व स्वच्छता कामगारांना या करारांतर्गत संधी मिळणार आहे. यासाठी लवकरच अर्ज मागविण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

