कोकणी उत्पादनांचे लवकरच मुंबईत प्रदर्शन
00643
00644
कोकणी उत्पादनांचे लवकरच मुंबईत प्रदर्शन
पालकमंत्री नीतेश राणे ः देश, विदेशात बाजारपेठ मिळविण्याचा हेतू
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २६ ः जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या दर्जेदार उत्पादनांना देश-विदेशात बाजारपेठ मिळावी या हेतूने कोकणी उत्पादनाचे मुंबई मंत्रालयात महिनाभरात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे, असे मत पालकमंत्री नीतेश राणे यांनी येथे व्यक्त केले.
येथील आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानातर्गंत येथील पंचायत समितीमध्ये महिला संमेलनाचे आयोजन केले होते. मेळाव्याला जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, उमेदचे जिल्हा व्यवस्थापक अभिजित परब, उद्योजिका संध्या तेरसे, भाजप तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, नेहा माईणकर, शारदा कांबळे, सीमा नानीवडेकर, वैशाली रावराणे, स्नेहलता चोरगे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.राणे म्हणाले, ‘जिल्ह्यातील अनेक महिला बचत गट दर्जेदार उत्पादनांची निर्मिती करतात. त्यांनी उत्पादित केलेल्या कोकणी उत्पादनांना राज्यातील विविध शहरांसह देश-विदेशात मोठी मागणी आहे. मात्र, अपेक्षित बाजारपेठ मिळत नसल्याने आर्थिक प्रगती झाली नाही. येथील बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळाली तर महिला सक्षमीकरणाला खऱ्या अर्थाने चालना मिळू शकेल. त्यामुळे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. केवळ स्थानिक बाजारपेठांमध्ये उत्पादित माल जाऊन उलाढाल वाढणार नाही तर त्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यांसह राज्यातील विविध शहरांमध्ये कोकणी उत्पादने पोहोचायला हवीत. याशिवाय देश-विदेशातही मोठी मागणी आहे. तेथेही उत्पादनांना बाजारपेठ मिळायला हवी या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मुंबई मंत्रालयातील एका सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत महिनाभरात महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांच प्रदर्शन महिनाभरात भरविण्याचा संकल्प आहे.’ दरम्यान, संमेलनाला प्रमोद रावराणे, दिलीप रावराणे, जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, मंगेश लोके आदी उपस्थित होते.
---
बचत गटांची उलाढाल वाढवू!
पालकमंत्री म्हणाले, ‘महिला सक्षमीकरणासाठी केंद्रासह राज्य शासन विविध योजना राबवित आहे. ‘लाडकी बहीण’ योजना, ‘लखपती दिदी’ यासारख्या कित्येक योजना शासनाने महिला सक्षमीकरणासाठी आणल्या आहेत. ‘उमेद’सारखे अभियान राबविले जात आहे. त्यामुळे महिलांनी सरकारच्या पाठीशी राहावे. योजना राबविणारे सरकार सत्तेत नसले तर त्या योजना बंद होतात. जिल्ह्यात महिला बचत गटांच्या माध्यमातून ५५ कोटींची उलाढाल होते ती आणखी वाढवायची आहे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

