भाजपला अंगावर घेण्याची तयारी
00665
भाजपला अंगावर घेण्याची तयारी
संजू परब ः घाबरत नाही, आणखी धक्के देणार
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २६ ः संजू परब कोणाला घाबरत नाही. घाबरणे हा माझा स्वभाव नाही. जे बोलायचंय ते स्पष्ट बोलतो. भाजपला अंगावर घेण्याची माझी तयारी आहे. यापुढे भाजपला धक्क्यावर धक्के देणार, असा सूचक इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज येथे दिला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील युवा तालुकाप्रमुख रियाज खान यांनी काल (ता.२५) आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख परब यांनी त्यांचे पक्षात स्वागत करत प्रत्येकाचा योग्य आदर आणि सन्मान केला जाईल, असे अभिवचन दिले. यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत कविटकर, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस, उपतालुकाप्रमुख राकेश पवार, युवासेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, बांदा शहर प्रमुख ज्ञानेश्वर सावंत, गुरु सावंत आदी उपस्थित होते.
श्री. परब म्हणाले, ‘‘विशिष्ट समाजातील लोकांना फसवून प्रत्येकी हजार रुपये देऊन प्रवेश केल्याचे भासविले आणि शिंदे सेनेला धक्का दिला अशा बातम्या पसरविल्या जात आहेत. तुम्ही नेमके कोणाला फसवताय ते बघा. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना फसवू नका. मी त्यांचे बूथ अध्यक्ष, तालुका व जिल्हा कार्यकारणी सदस्य शिवसेनेत घेतले. भाजपवाल्यांनी यावर बोलावे. एकाचीही हिंमत नाही. मागून चर्चा करणार. समोर बोलण्याची ताकद नाही. मी दिलेला शॉक त्यांना चांगलाच लागलाय. माझ्यावर आमदार दीपक केसरकर, नीलेश राणे यांचा वरदहस्त आहे. मी यापुढे शिवसेनेत भाजपचेच कार्यकर्ते घेणार. भाजपला धक्क्यांवर धक्के देणार. शिवसेनेला धक्का देणे तुमच्या ललाटी नाही.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘आतापर्यंत कोणाचा सातबारा चोरला नाही. कोणाचे पैसे देणे लागत नाही. गरिबांचे पैसे मी लुटत नाही. मी बॉडीगार्ड घेऊनही फिरत नाही कारण मला कोणी मारणारच नाही. कोणीही रस्त्यावर अडवून मला पैसे देण्याबद्दल विचारू शकत नाही. असे बोलल्यावर भाजपवाल्यांनी दुसऱ्या कोणाला दाबले असते. मला कोणीही दाबू शकत नाही. भविष्यात असा धक्का देणार की पुन्हा माणगाव खोऱ्यात नेऊन सोडणार.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

