सेरेना म्हसकरच्या यशामुळे
नांदगावासह देशात आनंद

सेरेना म्हसकरच्या यशामुळे नांदगावासह देशात आनंद

Published on

00820

सेरेना म्हसकरच्या यशामुळे
नांदगावासह देशात आनंद

आंतरराष्‍ट्रीय कबड्डी स्पर्धेत ‘सुवर्ण’

कणकवली, ता. २७ : बहरीनमधील मनामा येथे नुकतीच आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ झाली. यात मुलगे आणि मुली या दोन्ही गटांत भारताने सुवर्णपदक पटकावले. मुलींच्या संघात कणकवली तालुक्‍यातील नांदगावची सेरेना म्‍हसकर ही महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू होती. मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावल्‍यानंतर देशभरासह नांदगाव येथील नागरिकांनी अभिनंदन केले.
आशियाई युवा क्रीडा स्पर्धेसाठी मुलींचा संघ निवडण्यात आला. त्‍यावेळी महाराष्‍ट्रातून सेरेना म्‍हसकर या एकमेव खेळाडूची निवड झाली होती. नांदगाव-मधलीवाडी येथील मूळ रहिवासी असलेली सेरेना ही आपल्‍या कुटुंबासमवेत मुंबई, भांडूप येथे राहते. तिचे वडील सचिन आणि आई मेघाली यादेखील कबड्डीपट्टू आहेत. सेरेना हिची आई मेघाली यांना शिवछत्रपती पुरस्कारही प्राप्त झाला आहे. तसेच तिने महिला कबड्डी संघाचे उपकर्णधारपदही भूषविले होते. दरम्‍यान, सेरेनाच्या या यशामुळे नांदगाव येथे आनंदाचे वातावरण होते. तसेच तिच्यावर अभिनंदनाचा वर्षावही करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com