वसुलीला पुढे; सेवा देण्यात पूर्ण मागे
01059
वसुलीला पुढे; सेवा देण्यात पूर्ण मागे
मडुरावासीय आक्रमक; वीजप्रश्नी अभियंत्यांना घेराओ
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २८ ः महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात आणि वाढत्या वीज समस्यांमुळे त्रस्त झालेल्या मडुरा पंचक्रोशीतील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत सहायक अभियंता रघुनाथ ठाकूर यांना घेराओ घालून जाब विचारला. वीज बिल थकबाकी आणि वसुलीच्या बाबतीत महावितरण पूर्णपणे सतर्क असतो. मात्र, ग्राहक सेवा देण्यात मात्र पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप स्थानिकांनी केला. १० नोव्हेंबरपर्यंत सुधारणा न झाल्यास वेगळी पद्धत अवलंबू, तसेच व्यवस्थापकीय संचालकांकडे तुमच्या तक्रारीचा पाढा वाचू, असा इशाराही दिला.
मडुरा पंचक्रोशीतील संतप्त ग्राहकांनी बांदा महावितरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी कास सरपंच प्रवीण पंडित, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, मडुरा माजी उपसरपंच उल्हास परब, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वालावलकर, निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, नंदकिशोर कासकर आदी उपस्थित होते. दिवाळीच्या पूर्वसंध्येपासून वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे प्रवीण पंडित यांनी सांगितले. स्थानिक वायरमन आणि थेट सहायक अभियंता हे देखील ग्राहकांनी मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी केलेले फोन उचलत नाहीत, अशा तक्रारी केल्या. वीज बिल वसुली आणि थकबाकीच्या बाबतीत महावितरण तत्परता दाखवते. मात्र, ग्राहकांना आवश्यक सेवा आणि तातडीची मदत पुरवण्यात महावितरण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप श्री. गावडे यांनी केला.
---
...अन्यथा वरिष्ठांकडे तक्रारी करू!
मडुरा, रोणापाल भागात नवीन ११ केव्ही लाइन टाकण्याचे काम संबंधित ठेकेदार निकृष्ट करीत असल्याकडे उल्हास परब यांनी लक्ष वेधले. किरकोळ बिलांच्या रकमेसाठी लाईनमन वीज कनेक्शन तोडतात. असले प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा श्री. गवंडे यांनी दिला. यावेळी प्रकाश वालावलकर यांनी वायरमन, लाईनमन फोन उचलत नसल्याचे प्रत्यक्ष पुरावे सादर केले. कारभारात सुधारणा करा; अन्यथा व्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रारी करू, इसा इशारा दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

