उत्तम प्रशासकाची आठवण निरंतर

उत्तम प्रशासकाची आठवण निरंतर

Published on

01825

उत्तम प्रशासकाची आठवण निरंतर

नंदकुमार घाटे ः देवगडमध्ये ठाकूर, पुजारेंचा निवृत्तीनिमित्त सत्कार

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १ : येथील महसूल नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. त्यांना महसूल प्रशासनातर्फे सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. यावेळी त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून उद्योगपती नंदकुमार घाटे यांनीही शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. प्रशासनात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना समाज नेहमीच स्मरणात ठेवतो, असे मत श्री. घाटे यांनी व्यक्त केले. दरम्यान, सहायक महसूल अधिकारी मधुकर पुजारे यांचाही निवृत्ती निमित्ताने सत्कार झाला.
येथील तहसील कार्यालयातील महसूल नायब तहसीलदार ठाकूर तसेच सहायक महसूल अधिकारी मधुकर पुजारे निवृत्त झाले. यानिमित्ताने त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन कार्यालयात केले होते. तहसीलदार रमेश पवार, उद्योगपती नंदकुमार घाटे, श्रीकृष्ण ठाकूर, मधुकर पुजारे, सौ. अनुराधा ठाकूर, अमेय ठाकूर तसेच ठाकूर आणि पुजारे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी श्री. ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापला. श्री. ठाकूर सुमारे ३४ वर्षे २ महिन्यांच्या सेवेनंतर निवृत्त झाले. म्हापण येथे तलाठी म्हणून १६ जुलै १९९१ ला त्यांच्या सेवेची सुरुवात झाली. त्यानंतर केळुस, कोचरा, नाडण, वाडा, जामसंडे, वळिवंडे, तळगाव, पाटगाव येथे तलाठी म्हणून काम केल्यानंतर जून २०११ मध्ये कणकवली येथे पुरवठा निरीक्षक म्हणून बढती मिळाली. जून २०१४ पासून आंबोली येथे मंडल अधिकारी म्हणून काम केल्यानंतर ऑगस्ट २०१८ पासून नायब तहसीलदार म्हणून पेण येथे बढती मिळाली. त्यानंतर ऑक्टोबर २०२१ पासून येथील तहसीलदार कार्यालयात महसूल नायब तहसीलदार म्हणून ते कार्यरत होते. काही काळ त्यांनी येथे प्रभारी तहसीलदार म्हणूनही काम केले होते.
श्री. पुजारे यांची सुमारे २६ वर्षे सेवा झाली. यावेळी श्री. घाटे यांनी ठाकूर कुटुंबीयांच्या पूर्वीच्या कामकाजाची प्रशंसा केली, तर श्री. पवार यांनी, श्री. ठाकूर यांच्या प्रशासकीय कामकाजाबाबत ऊहापोह केला. श्री. ठाकूर आणि श्री. पुजारे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शाम जाधव, पी. के. कदम, अनिता ठाकूर, अमेय ठाकूर, मंडल अधिकारी डी. बी. चव्हाण, तलाठी आढाव, तलाठी अंधारे यांनीही मनोगत व्यक्त केले. नायब तहसीलदार संतोष खरात, सुचित्रा आडारकर आदी उपस्थित होते. प्रदीप कदम यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com