अविनाश नारकर, यादव यांना ''कोकण रत्न'' पुरस्कार प्रदान
01837
अविनाश नारकर, यादव यांना ‘कोकणरत्न’
मुंबईतील ‘कोकण कला महोत्सव’; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १ ः कोकणात सहकार आणि स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करणारे ‘वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.’चे अध्यक्ष आणि संस्थापक उद्योजक प्रशांत यादव, तसेच मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत आपल्या प्रभावी अभिनयाने ठसा उमटवणारे बहुआयामी अभिनेते अविनाश नारकर यांना ‘कोकणरत्न-२०२५’ पुरस्काराने गौरविण्यात आले. कोकण कला व शिक्षण विकास संस्थेतर्फे हा गौरव करण्यात आला.
‘कोकण कला महोत्सव-२०२५’ हा कार्यक्रम संस्थेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात उत्साहात झाला. या कार्यक्रमात ‘आपली माती, आपली माणसं आणि आपली संस्कृती’ या त्रिसूत्रीचा धागा धरून कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेतर्फे यंदाचा ‘कोकणरत्न-२०२५’ हा प्रतिष्ठित राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला. पद्मश्री मुरलीकांत पेटकर (चंदू चॅम्पियन) आणि संस्थाध्यक्ष दयानंद कुबल यांच्या हस्ते त्यांना गौरविले.
यावेळी आनंद फाउंडेशनच्या अध्यक्षा अपूर्वा वैद्य, लेखक-दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर, सिंधुदुर्ग सहकारी बँक, मुंबईचे सचिव दिनकर तावडे, ‘जीवन आनंद’चे अध्यक्ष संदीप परब, संस्कार क्लासेसचे अध्यक्ष रमेश राणे आदी उपस्थित होते. महोत्सवात विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले. समाज माध्यमांवर कार्यरत असलेल्या मंगेश काकड, आरती जळगावकर, आदिराज घनघाव, युवराज घनघाव, प्रा. संजय अप्पन आणि वीरू वज्रवाद यांना ‘रील टू रियल’, ग्रामीण महिलांसाठी ‘झीरो टू हिरो’, तरुण उद्योजकांसाठी ‘यूथ आयकॉन’, सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणीय कार्यासाठी ‘आदर्श गाव’, समाजकार्यासाठी ‘समाज गौरव’ व प्रेरणादायी कार्यासाठी ‘यू इन्स्पायर’ पुरस्कार प्रदान केले.
कार्यक्रमाला चिपळूण सहकारी बँकेच्या अध्यक्षा स्वप्नाली यादव, अभिनेते शंतनु रांगणेकर, निवृत्त मेजर आर्चिस सबनीस, विंग कमांडर वैष्णवी टोकेकर, कन्टेन्ट क्रिएटर सार्थक सावंत, साहिल दळवी, जनजागृती फाउंडेशनचे संस्थापक शरदचंद्र आढाव आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सुवर्णा आदी उपस्थित होते. अभिनेते अक्षय ओवळे, कोमल डांगे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थाध्यक्ष दयानंद कुबल यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

