

ग्राहक पंचायतीच्यावतीने
गोळवलीत अभ्यास वर्ग
गुहागर, ता. १ : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्यावतीने ८ व ९ नोव्हेंबर या कालावधीत पालघर, मुंबई ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोवा या कोकण प्रांतातील पदाधिकारी, नवीन सदस्य यांचा अभ्यास वर्ग गोळवली (ता. संगमेश्वर) येथील परमपूज्य गोळवलकर गुरुजी स्मृती प्रतिष्ठानमध्ये आयोजित केला आहे. कोकण प्रांत अध्यक्ष मानसिंग यादव व रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सचिन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा होणार आरे.
कोकण प्रांत सचिव चंद्रकांत मांडवकर, कोकण प्रांत सहसचिव विकास ढवण, चिपळूण तालुकाध्यक्ष प्रकाश सावर्डेकर, सहसचिव विलास सकपाळ, शिक्षण आयम प्रमुख चंद्रकांत कुलकर्णी यांनी गुहागर, मंडणगड, दापोली, खेड या तालुक्यांचा नुकताच दौरा करून तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या व ज्येष्ठ सदस्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. तसेच अभ्यास वर्गामध्ये होणाऱ्या विविध विषयांचे मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सर्वांना आवाहन केले. यावेळी गुहागर तालुकाध्यक्ष गणेश धनावडे, दापोली तालुकाध्यक्ष संदेश राऊत, मंडणगड अध्यक्ष दिनेश साप्ते, खेड अध्यक्ष विजय येरुणकर यांनी आपल्या मनोगतात जास्तीत जास्त सदस्य उपस्थित राहतील, असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.