देवरूख आगारात अडचणींचा प्रवाशांना होतोय त्रास

देवरूख आगारात अडचणींचा प्रवाशांना होतोय त्रास

Published on

एसटीच्या अकार्यक्षमतेचा प्रवाशांना फटका
निवृत्त कर्मचारी संघटनेचे देवरूख आगार व्यवस्थापकांना निवेदन; रोजचा प्रवास ठरतोय आर्थिक ओझं
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. २ ः एसटी बसेस उशिराने सोडणे, आयत्यावेळी स्लीपर सोडल्यामुळे सामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो, देवरूख आगारात पडलेल्या खड्ड्यांमुळे होणारी गैरसोय अशा विविध समस्या सोडवा, अशी मागणी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे देवरूख आगाराचे व्यवस्थापक यांच्याकडे केली आहे.
देवरूख आगारात गाड्यांची कमतरता असल्यामुळे रत्नागिरी मार्गावर सोडण्यात येणाऱ्या बसमध्ये विद्यार्थी, पासधारक प्रवासी, सवलतीचा लाभ घेणारे प्रवासी यांना प्रवेश दिला जात नाही. राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी यांना फरकाची रक्कम भरुन प्रवास करण्यास मुभा असलेले परीपत्रक असूनही वाहक प्रवास नाकारतात. प्रवाशांना जास्त पैसे देऊन प्रवास करावा लागतो. नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोज जादा पैसे भरून प्रवास करणे कठीण जाते. एसटी प्रशासनाकडे गाड्यांची कमतरता असल्यामुळे स्लीपर बसेस सोडल्या जात असल्या तरीही त्यातध्ये साध्या बसच्या दरात तिकिट आकारावे, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच देवरूख आगाराच्या प्रवेशद्वारावर भला मोठा खड्डा पडला असून त्यातील पाईप तुटून अर्धवट वरती आला आहे. त्यात दुचाकीसह पादचाऱ्यांचे अपघात होत आहेत. वयोवृद्ध नागरिकांना चालणेही धोकादायक झालेले आहे. आगारात अनेक खड्डे पडलेले आहेत. त्यामध्ये अनेक प्रवासी धावताना पडतात आणि जखमी होत आहेत. पावसामुळे पाणी अंगावर उडाल्यामुळे विद्यार्थी, प्रवासी यांचे कपडे खराब होतात. देवरूख, साखरपा वाहतूक नियंत्रण कक्षातील फोन काहीवेळा बंद असतात, तर काहीवेळा उचलले जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांना बससेची चौकशी करावयाची असल्यास अडचण निर्माण होते. शालेय फेऱ्या अनियमित सूटत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. बसस्थानकावरील इमारतीच्या छतामधून पावसाचे पाणी प्रवाशांच्या अंगावर पडते. त्यामुळे प्रवाशांचे कपडे आणि साहित्य खराब होते. प्रवाशांना बसण्यासाठी ठेवलेल्या खुर्च्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. या समस्यांकडे देवरूख प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी पत्राद्वारे राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या देवरूख शाखेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रादेशिक सचिव विजय शिंदे यांनी केली आहे.

चौकट
प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण
खेडेगावातील वस्तीच्या फेऱ्या उशिरा सोडण्यात येत असल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होते. अनेकवेळा बसस्टॉपपासून वाड्या-वस्त्या लांब असल्यामुळे काळोखातून घरापर्यंत जाणे धोकादायक ठरत आहे. सध्या देवरूख परिसरातील जंगल भागामध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे बसमधून आलेल्या प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com