संगमेश्वर-फुणगुसमधील शेतकऱ्यांची शेती उदध्वस्त

संगमेश्वर-फुणगुसमधील शेतकऱ्यांची शेती उदध्वस्त

Published on

rat2p21.jpg-
01997
संगमेश्वर ः तालुक्यातील फुणगूस येथील शेतकऱ्यांचे पावसाने शेतीचे नुकसान झाले.
-----------
फुणगूसमध्ये पावसाने भात शेतीचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २ः तालुक्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. जीवापाड जपलेली भातशेती पावसाने वाहून गेली आहे. केवळ भात शेतीवर अवलंबून असणाऱ्यांना सर्वस्व वाहून गेल्याचे दुःख आहे. अशीच व्यथा संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस गावातील शेतकऱ्यांनी मांडली आहे.
फुणगूस गावातील शेतकरी चंद्रकांत तानाजी घडशी म्हणाले, ‘शेती हीच उपजीविकेचा एकमेव आधार असलेले आमचे कुटुंब आज अत्यंत कठीण परिस्थितीत सापडले आहे. घडशी कुटुंबातील सात सदस्यांचे पोट या भातशेतीवरच अवलंबून आहे. पीक उत्तमपणे वाढून कापणीसाठी सज्ज होते; पण अनपेक्षित पावसाच्या तडाख्याने काही तासांतच सर्व काही संपवलं. भातशेतीचं पूर्ण नुकसान झाल्याने घरात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. आमचं रेशन कार्ड गरीब रेषेच्यावर असल्याने आम्हाला शासनाकडून धान्य मिळत नाही. शेतीचे सर्व काही आहे आणि आता तेच नाहीसं झालं. घरातले सातजण काय खाणार, कसं जगणार हा प्रश्न आहे, असे घडशी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com