सावंतवाडीत बुधवारी ‘हे चांदणे फुलांनी’
सावंतवाडीत बुधवारी ‘हे चांदणे फुलांनी’
सावंतवाडी ः श्री सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, सावंतवाडी आणि सावंतवाडी नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने सलग आठव्या वर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘हे चांदणे फुलांनी’ या जुन्या-नव्या हिंदी आणि मराठी चित्रपट गीतांच्या सदाबहार मैफलीचे आयोजन केले आहे.
हा कार्यक्रम बुधवारी (ता.५) सायंकाळी सहाला जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यानात रंगणार आहे. माजी विद्यार्थी व ‘गौरव महाराष्ट्राचा फेम’ सागर मेस्त्री (मुंबई) यांचे खास सादरीकरण असेल. या कार्यक्रमात सद्गुरु संगीत विद्यालयाचे विद्यार्थी वर्षा देवण-धामापुरकर, ॲड. सिद्धी परब, समृद्धी सावंत, मधुरा खानोलकर, केतकी सावंत, निधी जोशी, नितीन धामापुरकर, भास्कर मेस्त्री आणि सर्वेश राऊळ सहभागी होणार आहेत. संगीताला साथसंगत हार्मोनियम: नीलेश मेस्त्री, तबला: किशोर सावंत, सिद्धेश सावंत, निरज भोसले, ऑक्टोपॅड: अश्विन (गुड्डू) जाधव, सिंथेसायझर: मंगेश मेस्त्री, गिटार: दुर्वा सावंत देणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कात्रे तर ध्वनी संयोजन सुभाष शिरोडकर (बांदा) करणार आहेत. नीलेश मेस्त्री यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होणार आहे.
------
आचऱ्यात मंगळवारी नृत्यदिग्दर्शन स्पर्धा
आचरा ः येथील इनामदार रामेश्वर मंदिरात कार्तिकोत्सवानिमित्त मंगळवारी (ता.४) रात्री पालखी सोहळ्यानंतर एक विशेष भक्तिगीत नृत्यदिग्दर्शन स्पर्धा आयोजित केली आहे. या अनोख्या स्पर्धेत सहभागी संघांनी निवडलेल्या भक्तिगीतांवर समूह नृत्य सादर करायचे असून, प्रत्येक सादरीकरणाचे परीक्षण नृत्यदिग्दर्शकाच्या कल्पकतेनुसार करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील बक्षिसांचे मानकरी नृत्यदिग्दर्शक स्वतः असतील. स्पर्धेसाठी प्रथम ५,००० हजार व स्मृतिचिन्ह, द्वितीय ३,००० व स्मृतिचिन्ह, तृतीय २,००० व स्मृतिचिन्ह, उत्तेजनार्थ १,००० व स्मृतिचिन्ह अशी आकर्षक पारितोषिके ठेवली आहेत. अधिक माहितीसाठी विजय कदम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

