सावंत बंधूंचे सामाजिक कार्य उल्लेखनीय

सावंत बंधूंचे सामाजिक कार्य उल्लेखनीय

Published on

02025

सावंत बंधूंचे सामाजिक कार्य उल्लेखनीय

विनायक राऊत ः पणदूर येथे ज्येष्ठ भजनी बुवांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ ः माजी आमदार (कै.) पुष्पसेन (नाना) सावंत यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे सुपुत्र अमरसेन सावंत आणि भूपतसेन सावंत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करत आहेत. अमरसेन सावंत यांचे सामाजिक कार्य आणि जनसंपर्क मजबूत असून त्यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी असलेली निष्ठा अबाधित राहील, असा विश्वास माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.
डिगसचे माजी सरपंच (कै.) शंकर (बाळू) गावडे आणि माजी आमदार (कै.) पुष्पसेन (नाना) सावंत यांच्या स्मरणार्थ अमरसेन सावंत मित्रमंडळातर्फे पणदूरतिठा येथे तिरंगी डबलबारी भजन सामना व पंचक्रोशीतील ज्येष्ठ भजनी बुवांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनीही कार्यक्रमाला भेट दिली.
श्री. राऊत म्हणाले, ‘‘सध्याच्या राजकीय परिस्थितीत अमरसेन सावंत हे ठाकरे शिवसेनेशी निष्ठावान आहेत. अमरसेन सावंत आणि त्यांच्या मित्रमंडळाने सुरू केलेला हा उपक्रम सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. भजनातून लोकांमध्ये भक्तीचा संदेश पोहोचतो.’’
बाबुराव धुरी म्हणाले, ‘‘पुष्पसेन सावंत यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा कार्यक्रम म्हणजे भक्ती व सामाजिक कार्य यांचा संगम आहे.’’ अमरसेन सावंत म्हणाले, ‘‘भजनाचा हा उपक्रम पुष्पसेन सावंत आणि शंकर गावडे यांच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी आयोजित केला जातो.’’
भजन सामन्यात बुवा विनोद चव्हाण (भरणी), बुवा संदेश कसबले (डिगस) आणि बुवा संदीप लोके (देवगड) यांनी सहभाग घेतला. व्यासपीठावर जिल्हा परिषद माजी गटनेते नागेंद्र परब, राजन नाईक, मंदार शिरसाट, माजी उपसभापती जयभारत पालव, भूपतसेन सावंत, डिगस सरपंच पुनम पवार, अणाव सरपंच लिलाधर अणावकर, हुमरमळा सरपंच समीर पालव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com