मोंथाचा जिल्ह्यातील 4 हजार शेतकऱ्यांना फटका
जिल्ह्यात चार हजार शेतकरी
चक्राच्या वादळात; ६५ लाखांचा फटका
पंचनामे सुरू ः रविवारी पावसाची विश्रांती, भात कापणी सुरू
जिल्ह्यात चार हजार शेतकऱ्यांना ६५ लाखांचा फटका
जिल्ह्यात पंचनामे सुरू ः रविवारी पावसाची विश्रांती, भात कापणी सुरू
रत्नागिरी, ता. २ ः चक्रीवादळाच्या प्रभावाने मागील आठवडाभर धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने रविवारी (ता. २) विश्रांती घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांनी निःश्वास सोडला. मात्र, ऐन कापणी पडलेल्या पावसामुळे भात आणि नाचणी पिकाला फटका बसला आहे. कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यातील ४००० हून अधिक शेतकऱ्यांचे ७७२ हेक्टरवरील क्षेत्राचे ६५ लाख रुपये इतके नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. या पावसात कापलेले भात भिजून गेले. काही ठिकाणी तर भात पीक पूर्णपणे आडवे झालेले आहे. ३ नोव्हेंबरपर्यंत मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्यामुळे तयार भाताची कापणी रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रविवारी दिवसभर पडलेल्या कडकडीत उन्हामुळे पाण्यात भिजलेले भात वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झालेली आहे. जिल्ह्यात अजूनही सुमारे १० हजार हेक्टर क्षेत्रावरील भात कापणी शिल्लक आहे. कृषी विभागाकडून पावसामुळे नुकसान झालेल्या परिसरातील शेतीचे पंचनामे केले जात आहेत. वादळी पावसाने जिल्ह्यातील ५०१ गावांतील ७७२ हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ४ हजार ०६५ शेतकऱ्यांना फटका बसला. त्यामध्ये भाताचे क्षेत्र ७४४ हेक्टर असून, नाचणी २६ हेक्टर आहे. शेताचे ६५ लाख ८८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी साडेआठ हजार रुपये मदत दिली जात आहे.
जिल्ह्यात शेतीचे नुकसान तालुकानिहाय आकडेवारी
तालुका शेतकरी क्षेत्र (हेक्टर)
* मंडणगड ९५२ २१६
* दापोली ७१५ १३५.५१
* खेड ६१५ ११३.५४
* चिपळूण ५२६ ८५.३६
* गुहागर १६० ३१.२६
* संगमेश्वर २७९ ४२.८०
* रत्नागिरी ५३३ ७४.६६
* लांजा १७५ ४२.७५
* राजापूर ११० २९.८७
कोट
संततधार सुरूच राहिल्याने शेतात तयार पीक पाण्यात भिजून गेले आहे. अक्षरशः शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट डोळ्यांसमोर वाया जात असल्याचे चित्र आहे. शासनाने सरसकट नुकसानभरपाई दिली पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे, त्यांच्याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यांचे पंचनामे वेळेत झाले पाहिजेत.
- राजेंद्र कदम, शेतकरी, रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

