विठुरायाच्या दर्शनाला,यात्रेला अलोट गर्दी
०१९९०
विठुरायाच्या दर्शनाला अलोट गर्दी
प्रतिपंढरपूर यात्रा; कडकडीत उन्हामुळे भक्तांसह शेतकरीही सुखावले
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : वादळी पावसाने अनेक ठिकाणी व शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचे रक्षण कर, असे गाऱ्हाणे देवस्थानतर्फे विठुरायाला घातले आणि काल मध्यरात्रीपासून पावसाने पूर्ण विश्रांती घेतली. विठुरायाच्या कृपेने आज रत्नागिरी शहरात कार्तिकी एकादशीची प्रतिपंढरपूर यात्रा सुरळीत पार पडली. यात्रेने उच्चांक गाठला कारण ही यात्रा नेहमीच्या जागा व्यतिरिक्त धनजी नाका, फाटक हायस्कूलपर्यंत पोहोचली. यात्रेत दोन कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिरात आज पहाटे पवमान पूजा करण्यात आली. सौ. माधवी व गौरव मनोहर हेळेकर यांना प्रथम पूजेचा मिळाला. हेळेकर कुटुंबीय, विठ्ठल मंदिर देवस्थान पदाधिकारी, विठ्ठल मंदिर मित्रमंडळाच्या सदस्यांनी पूजेवेळी भरपूर गर्दी केली. पूजा, अभिषेक, आरती, छप्पन भोग नैवेद्य दाखविल्यानंतर विठ्ठलाच्या दर्शनाला प्रारंभ झाला. त्यानंतर काकडा आरती, दिवसभर विविध भजन मंडळांची भजने यामुळे वातावरण विठ्ठलमय झाले.
दरम्यान (कै.) दाजी नाचणकर, (कै.) अप्पा नाचणकर संचलित पायी दिंडी भार्गवराम मंदिर, परटवणे येथून श्री विठ्ठल मंदिरात पोहोचली आणि सारी भक्तमंडळी भावूक झाली. या दिंडीचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. विठुरायाच्या रथाची मिरवणूक रात्री १२ वाजता निघाली. ठरलेल्या मार्गावरून रथ फिरून आल्यावर हरिहरेश्वराची पहाटे ५ च्या सुमारास तृणबिंदुकेश्वराच्या मंदिरात भेट, त्यानंतर द्वादशीची काकड आरती ही प्रथा जपण्यात आली. शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्यासह मान्यवर मंडळींनी विठुरायाचे दर्शन घेतले. कार्तिकी उत्सव यशस्वी करण्यासाठी देवस्थानचे अध्यक्ष आनंद मराठे, सचिव विजय पेडणेकर, कोषाध्यक्ष प्रमोद रेडीज, राजन फाळके यांच्यासमवेत पदाधिकारी, सदस्यांनी मेहनत घेतली.
वैकुंठ चतुर्दशीला
नगर प्रदक्षिणा
एकादशीनंतर विठ्ठलाची नगर प्रदक्षिणा वैकुंठ चतुर्दशीला मंगळवारी (ता. ४) दुपारी १२ वाजता प्रथेप्रमाणे सुरू होणार आहे. विठ्ठलाच्या पालखीची शहरातून ठरलेल्या मार्गावरून मिरवणूक काढली जाणार आहे. शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू असून, या नगर प्रदक्षिणेत शेकडो भाविक सहभागी होणार आहेत.
यात्रेत कोटींची उलाढाल
रविवारी कार्तिकी यात्रेत गर्दीने उच्चांक गाठला. विठोबाचे दर्शन घेऊन अनेकांनी जत्रेत खरेदी केली. या जत्रेतून सुमारे दोन कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जत्रेतील बहुसंख्य व्यापारी परजिल्ह्यांतून आले होते. स्टॉल्स व फिरते विक्रेते होते. शोभेच्या वस्तू, लहान मुलांसाठी खेळणी, कपडे, रांगोळ्या, गृहोपयोगी वस्तू, कपडे, भांडी, घर सजावटीचे साहित्य, दागदागिने, शोभेच्या वस्तू विक्री उपलब्ध होत्या. रामआळी, गाडीतळ, काँग्रेस भवनच्या रस्त्यावर, टिळक आळीकडे जाणाऱ्या मार्गावरही बॅरिकेडस् लावल्याने व्यापाऱ्यांची गर्दी झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

