भाजप दक्षिण रत्नागिरी महिला मोर्चातर्फे
-rat११p१८.jpg-
२५O०३७३१
रत्नागिरी : भाजप दक्षिण रत्नागिरी महिला मोर्चातर्फे आयोजित बचतगटांचे तालुकास्तरीय संमेलनात सहभागी महिला.
--------
बचतगटांचे तालुकास्तरीय संमेलन
रत्नागिरी, ता. १२ : भाजप रत्नागिरी दक्षिण महिला मोर्चाच्यावतीने आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी या संकल्पनेवर आधारित महिलांच्या बचतगटांचे तालुकास्तरीय संमेलन आयोजित करण्यात आले. या संमेलनामध्ये विविध बचतगटांच्या कार्यकर्त्या तसेच सीआरपी प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन आयोजित केले. महिलांच्या उद्योगांना चालना मिळावी, स्थानिक स्वदेशी उत्पादनांचे उत्पादन आणि विपणन वाढावे, यासाठी माहिती देण्यात आली. या प्रसंगी मार्गदर्शन करताना महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांनी पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘स्वदेशीचा प्रसार’ या सूचनेचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाचे नियोजन सुचिता नाचणकर, अनुष्का शेलार यांनी केले. या वेळी अनुश्री आपटे, नुपुरा मुळे, शिवानी रेमुलकर, शुभांगी घाणेकर, सायली केतकर, मंदा ठीक, मेधा देवस्थळी, केतकी केळुसकर, नम्रता इंगवले, वैभवी पालेकर, अश्विनी शेलार, मंजिरी चव्हाण आदींसह महिला उपस्थित होत्या.
----

