धामणवणे ग्रामपंचायतीच्या इमारत कामाचे भूमिपूजन

धामणवणे ग्रामपंचायतीच्या इमारत कामाचे भूमिपूजन

Published on

-ratchl११३.jpg-
P२५O०३७५१
चिपळूण ः धामणवणे ग्रामपंचायत नूतन इमारतीचे भूमिपूजन करताना आमदार शेखर निकम, शेजारी मान्यवर.
------
धामणवणे ग्रामपंचायत
इमारतीचे भूमिपूजन
चिपळूण, ता. १२ ः धामणवणे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले. या वेळी सरपंच सुनील सावंत, उपसरपंच विजयालक्ष्मी वरेकर, नितीन ठसाळे, विनोद भुरण, दिशा दाभोळकर, रिया कांबळे, नितीश शिगवण आदी उपस्थित होते. या इमारतीसाठी २० लाखांचा निधी मंजूर आहे. ही इमारत साकारण्यासाठी ५० लाखांपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी आवश्यक निधी मिळवण्याची जबाबदारी मी स्वतः घेईन. धामणवणे परिसरातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी कोयनेचे वाहून जाणारे अवजल गावाच्या डोंगरावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे आमदार शेखर निकम यांनी सांगितले.
---

Marathi News Esakal
www.esakal.com