‘कोरे’चा २३ नोंव्हबरपर्यंत ‘मेगा ब्लॉक’
‘कोरे’चा २३ नोंव्हबरपर्यंत ‘मेगा ब्लॉक’
गाड्यांच्या वेळेत बदल; ठोकुर - जोकट्टे दरम्यान दुहेरीकरण
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १२ ः कोकण रेल्वे मार्गावरील ठोकुर आणि जोकट्टे यार्ड येथे नवीन पॉइंट्स कट आणि कनेक्शन जोडण्याच्या कामासाठी तसेच ठोकुर - जोकट्टे विभागादरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी दक्षिण रेल्वेने १२ ते २३ नोव्हेंबर पर्यंत प्री - एनआय ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरील काही गाड्यांच्या वेळा आणि स्थानकांत बदल करण्यात आला आहे. कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी ही माहिती दिली.
नारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावर १३ नोव्हेंबर रोजी गाडी क्रमांक १९२५९ तिरुवअनंतपुरम उत्तर ते भावनगर एक्स्प्रेस १५ मिनिटांसाठी थांबविण्यात येईल. तसेच गाडी क्र. १६३४५ लोकमान्य टिळक (टी) ते तिरुवअनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेस प्रवास २० मिनिटांसाठी थांबविला जाईल. गाडी क्रमांक २०९१० पोरबंदर ते तिरुवनंतपुरम नॉर्थ एक्स्प्रेस प्रवास २० मिनिटांसाठी नियमित केला जाईल.
गाडी क्रमांक १९५७८ जामनगर ते तिरुनेलवेली एक्स्प्रेस प्रवास ३० मिनिटांसाठी नियमित केला जाईल. गाडी क्रमांक १९५७८ जामनगर ते तिरुनेलवेली एक्स्प्रेस प्रवास १ तास ४० मिनिटांसाठी थांबला जाईल. या मार्गावर १७ नोव्हेंबर गाडी क्रमांक ०२१९७ कोइम्बतूर ते जबलपूर विशेष प्रवास रात्री २०.०५ वाजता उशिरा सुरू होणार आहे. तसेच गाडी क्रमांक ११०९८ एर्नाकुलम जंक्शन ते पुणे एक्स्प्रेसचा प्रवास रात्री २१.५० वाजता सुरू होईल.
गाडी क्र. १६३४५ लोकमान्य टिळक (टी) ते तिरुवअनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेस प्रवास एकतास थांबवला जाईल. तसेच १८ नोव्हेंबर रोजी गाडी क्रमांक ५६६१६ मंगळुरू सेंट्रल ते मडगाव जंक्शन प्रवास २० मिनिटांसाठी नियंत्रित केला जाईल. गाडी क्रमांक १२६१९ लोकमान्य टिळक (टी) ते मंगळुरू सेंट्रल एक्स्प्रेस प्रवास २० मिनिटांसाठी थांबवला जाईल. गाडी क्रमांक २०९२४ गांधीधाम जंक्शन ते तिरुनेलवेली एक्स्प्रेस प्रवास १५ मिनिटांसाठी थांबवला जाईल.
----
गाड्यांचे अल्पकालीन टर्मिनेशन असे
२२ नोव्हेंबर रोजी सुरू होणारी गाडी क्रमांक १२१३३ मुंबई सीएसएमटी ते मंगळुरू जंक्शन एक्स्प्रेस प्रवास सुरतकल येथे अल्पकालीन टर्मिनेशन केला जाईल आणि सुरतकल आणि मंगळुरू जंक्शन दरम्यान अंशतः रद्द केला जाईल. तसेच २३ नोव्हेंबर रोजी सुरू होणारी गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू जंक्शन ते मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस प्रवास सुरतकल येथून अल्पकालीन टर्मिनेशन केला जाईल आणि मंगळुरू जंक्शन आणि सूरतकल दरम्यान अंशतः रद्द केला जाईल, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

