विज्ञान प्रतिकृतीतून नव्या पिढीची प्रयोगशीलता

विज्ञान प्रतिकृतीतून नव्या पिढीची प्रयोगशीलता

Published on

03925

विज्ञान प्रतिकृतीतून नव्या पिढीची प्रयोगशीलता

कामळेवीर प्रशालेची कल्पकता; विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक विज्ञान मॉडेल्स

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा झाराप कामळेवीर येथे विज्ञानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करणे व अंधश्रद्धा निर्मूलनाचे भान जागविणे या उद्देशाने ‘विज्ञान प्रतिकृती तयार करणे स्पर्धा व प्रदर्शन’ उत्साहात पार पडले. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा व विज्ञानविषयक जाणिवेचा उत्कृष्ट प्रत्यय देत विविध नावीन्यपूर्ण, आकर्षक आणि उपयोगी विज्ञान मॉडेल्स तयार करून प्रदर्शनात मांडले.
काही मॉडेल्समध्ये सौरऊर्जेचा वापर, पर्यावरण संवर्धन, जलशुद्धीकरण, चुंबकीय शक्ती, मानवी श्वसनसंस्था अशा शैक्षणिक व सामाजिक जाणीव जागविणाऱ्या संकल्पना दिसून आल्या. सातवीतील कुमार हर्ष रेडकर, अजय कक्केरकर, हरिश्चंद्र गुडेकर, अथर्व वेंगुर्लेकर, अलीना जद्दी, कृतिका रेडकर, आरोही धुरी, दूर्वा वराडकर, वैष्णवी रायदुर्ग, अनन्या आळवे, सुलोचना मुंडये, लावण्या गुडेकर, महिमा कानसे, निधी वराडकर, सहावीतील सोहम गंगाधरे, पाचवीतील आराध्या आळवे, श्रिया गोवेकर, उर्मी रेडकर, आराध्या मांजरेकर, तर चौथीतील नील वेंगुर्लेकर यांनी सहभाग नोंदवत आपल्या कल्पनेतून विज्ञान प्रतिकृती साकारल्या. या स्पर्धेचे मार्गदर्शन पदवीधर शिक्षिका निरवडेकर व श्री. गोठोस्कर यांनी केले. परीक्षणाचे काम उपशिक्षक आजगावकर व राऊळ यांनी पार पाडले. विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करत त्यांनी मॉडेल्समधील नवकल्पकता, सादरीकरण आणि संकल्पनांचे स्पष्टीकरण यावर कौतुकाची थाप दिली.
मुख्याध्यापक कदम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विज्ञानाची आजच्या काळातील गरज अधोरेखित केली. आपल्या शाळेतीलच भावी वैज्ञानिक समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देतील, हीच आमची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. उपक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिक्षकांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com