कुशेवाडा ग्रामपंचायतीतर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान
03933
कुशेवाडा ग्रामपंचायतीतर्फे
ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान
म्हापण ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कुशेवाडा येथे गावातील २१२ ज्येष्ठ नागरिकांचा भेटवस्तू, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी सभापती व उद्योजक नीलेश सामंत उपस्थित होते. त्यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या केलेल्या सन्मानाबद्दल समाधान व्यक्त केले. सरपंच नीलेश सामंत यांनी ज्येष्ठांच्या गाव विकासातील योगदानाबद्दल आभार मानले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश देसाई, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश राणे, ग्रामविकास अधिकारी आनंद परुळेकर, तलाठी नायकोडे, पोलिसपाटील प्रियदर्शी कदम, तंटामुक्ती अध्यक्ष नीलेश परुळेकर, मंदाबाई परुळेकर, शामजी राऊळ, बाळाजी कदम, अरुणा सामंत उपस्थित होते. मंदाबाई परुळेकर, शामजी राऊळ, बाळाजी कदम, अरुणा सामंत यांनी सन्मान कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. ग्रामविकास अधिकारी आनंद परुळेकर यांनी सूत्रसंचालन केले.

