सागर वाघमारे, समृद्धी घाडिगावकरचे वर्चस्व
-rat१२p४.jpg-
२५O०३८९५
गुहागर ः राज्य कॅरम स्पर्धेत विजयी झालेले खेळाडू बसलेले डावीकडून पंकज पवार, सागर वाघमारे, समृद्धी घाडीगावकर आणि आकांक्षा कदम.
-----
वाघमारे, घाडीगावकरचे वर्चस्व
राज्य कॅरम स्पर्धा; विकास धारिया, सोनाली कुमारीला तृतीय
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १२ ः येथील भंडारी सभागृहात आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटात पुण्याचा सागर वाघमारे तर महिला एकेरीत ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरने विजेतेपद पटकावले.
प्रदीप परचुरे व कॅरम लव्हर्स ग्रुप गुहागर आयोजित या राज्यस्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या सागर वाघमारेने ठाण्याच्या पंकज पवारवर २५-२१, २५-१९ अशी सहज मात करून या गटाचे विजेतेपद पटकावले. तर तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत मुंबईच्या विकास धारियाने मुंबईच्या निलांश चिपळूणकरला ७-२५, २५-१०, २५-१३ असे पराभूत केले. महिला एकेरीमध्ये अंतिम फेरीत ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमला रंगतदार लढतीत २१-२५, २४-५ व २२-२० असे पराभूत करून या गटाचे विजेतेपद पटकावले तर तिसरा क्रमांक प्राप्त करताना मुंबईच्या सोनाली कुमारीने मुंबईच्या रिंकी कुमारीला २५-१३, २५-११ असे पराभूत केले.
विजेत्या खेळाडूंना आयोजक प्रदीप परचुरे परिवार, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, उपाध्यक्ष यतीन ठाकूर, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, सचिव मिलिंद साप्ते यांच्या हस्ते रोख पारितोषिके, प्रमाणपत्र व चषक देऊन गौरवण्यात आले. तत्पूर्वी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्यफेरीत समृद्धी घाडीगावकरने रिंकी कुमारीचा २५-२३, २५-१, रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने सोनाली कुमारीचा १२-२१, २५-२१, १९-१६ गुणांनी पराभव केला होता. पुरुष एकेरीतील उपांत्यफेरीत सागर वाघमारेने निलांश चिपळूणकरचा २२-१६, ३-२५, २५-२, पंकज पवारने विकास धारियाचा २५-११, २१-७ असा पराभव केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

