क्राईम

क्राईम

Published on

विवाहितेची गळफास
घेऊन आत्महत्या
रत्नागिरी ः तालुक्यातील वरवडे येथील विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अनिशा अनिल गोरे (३३, रा. वरचे वरवडे, रत्नागिरी) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता.११) दुपारी घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिशा आणि मुलगा असे दोघेच या मंगळवारी घरात होते. अनिशा यांनी राहत्या घराच्या भालाला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. दुपारी पती अनिल दत्ताराम गोरे घरी आले असता त्यांना पत्नी अनिशा या गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यांनी तातडीने याबाबत जयगड पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. याबाबत जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी
मद्य पिणाऱ्यांवर गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील नाणीज येथील सार्वजनिक रस्त्यावर मद्य पिणाऱ्या प्रौढांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन शांताराम भायजे (४२) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ११) सायंकाळी निदर्शनास आली. या प्रकरणी पोलिस शिपाई सूर्याजी पाटील यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

शेकोटी घेताना
महिला भाजून जखमी
रत्नागिरी ः परिसरातील पालापाचोळा गोळा करून शेकोटी घेताना ओढणी व गाऊनने पेट घेतल्यामुळे महिला ६० टक्के भाजली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. मुमताज मुनवर पाटणकर (वय ५२, रा. आंबवली देवरूख, ता. संगमेश्वर) असे भाजलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १२) सकाळी आंबवली-देवरूख येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुमताज सकाळी घराच्या परिसरातील पालापाचोळा गोळा करून तो पेटवून शेकोटी घेत होती. अचानक तिच्या ओढणीने व गाऊनने पेट घेतला. त्यामध्ये ती ६० टक्के भाजली. तत्काळ तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी रुग्णालयाच्या पोलिसचौकीत नोंद करण्यात आली आहे.

जयस्तंभ सर्कलला
ट्रकची धडक
रत्नागिरी ः शहरातील जयस्तंभ येथील सर्कलचे गतवर्षी नूतनीकरण करण्यात आले होते. या सर्कलला किल्ल्याच्या बुरुजांचा आकार देऊन जयस्तंभाचे सुशोभीकरण केले होते; मात्र मंगळवारी (ता. ११) सायंकाळी फिनोलेक्सकडून येणाऱ्या एका ट्रकने हा सुशोभीकरण केलेल्या कठड्याला धडक दिली. कठडा तुटला; मात्र जयस्तंभ सर्कलचे हायमॅक्स उशिरा लागत असल्यामुळे या काळोखाचा फायदा घेऊन ट्रकचालकाने कठड्याला धडक देऊन पलायन केले. हा प्रकार ट्रॅफिक पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या ट्रकचालकाचा फोटो काढला आहे. या कठड्याची नुकसान भरपाई त्या ट्रकचालक अथवा वाहतूक कंपनीकडून घेण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com